Ajit pawar | ‘अजित पवार यांनी खुट्टा ठोकला, त्यामुळे तुमच्यात….’ शिवसेनेच सडेतोड प्रत्युत्तर
Ajit pawar | "नेत्यांनी तुम्हाला दाखवून दिले की, आपण एका लायनीत बसायला हवे, उद्धव ठाकरे यांच्या साठी असलेली विशेष खुर्ची काढायला लावली. सिल्व्हर ओक वर जाऊन कॉम्प्रोमाईज करावं लागतं"
मुंबई : “विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेत, यावर स्पष्ट करतो, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता?” असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विचारला. “राहुल गांधी सोबत भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले, हे कोणत्या तत्वात बसते. तुम्हाला न बोलवता तुम्ही गेलात, त्यामुळे तुम्ही मातोश्रीची किंमत घालवली” अशी टीका संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली.
“नेत्यांनी तुम्हाला दाखवून दिले की, आपण एका लायनीत बसायला हवे, उद्धव ठाकरे यांच्या साठी असलेली विशेष खुर्ची काढायला लावली. सिल्व्हर ओक वर जाऊन कॉम्प्रोमाईज करावं लागतं. अजित पवार यांनी खुट्टा ठोकला त्यामुळे तुमच्यात बदल झाला, आता तुमची जळलेली आहे” असं संजय शिरसाट राऊतांवर टीका करताना म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावर महत्वाच विधान
“20 तारखेच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीवरून आल्यावर उत्तर मिळेल. मंत्री मंडळाचा विस्तार करायचा आहे. मोठ्या नेत्यांकडून अप्रुवल घेतले असून देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब घोषणा करतील. फॉर्म्य़ुला ठरलेला नाही. प्रत्येकाला संधी दिली जाणार. छोट्या गोष्टी साठी भांडण होणार नाहीत” असं शिरसाट म्हणाले. शरद पवार हे मोठे नेते
“अजित दादा खरं बोलतात हे राज्याला महित आहे. पण संजय राऊत खोटं बोलतो. शरद पवार हे मोठे नेते आहेत. उंचीनुसार बोलायला हवे, त्यांचा सन्मान करायला हवा. मुनगंटीवार काय बोलले माहीत नाही, मोठया नेत्यांना अस बोलणे योग्य नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.