चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : कोरोनामुळे नाशिक शहरातील (Nashik Corona Update) विकासकामे ठप्प झालेली असताना सिडको आणि मायको सर्कल परिसरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल रद्द करून तो निधी नगरसेवकांना द्यावा, असं पत्र नाशिकच्या महापौरांनी दिलं. असे असताना शिवसेनेनं मात्र उड्डाणपुलालाचं काम रेटून नेलं आहे. त्यामुळे आता सेना-भाजपा वादाची ठिणगी पडली आहे. (ShivSena vs BJP fight over two Flyover in Nashik)
नाशिकच्या मायको सर्कल आणि सिडको परिसरात उभारण्यात येणाऱ्या दोन उड्डाणपुलांवरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. हे काम तात्काळ थांबवावं असं पत्र महापौरांनी बांधकाम विभागाला दिलेलं असताना, दुसरीकडे बांधकाम विभागाने मात्र या कामासाठी कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सेना-भाजपामध्ये वादाचं पर्व सुरू झालं आहे.
भारतीय जनता पक्ष विकासकामांच्या आड येत असल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. शहरात दोन उड्डाणपूल होत असतील तर त्यात अडचण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता नगरसेवकांना जास्तीत जास्त निधी मिळाल्यास शहराच्या प्रत्येक भागात आणि प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात चांगली कामं होतील आणि शहराच्या चारही कोपऱ्यांना न्याय देता येईल, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, बांधकाम विभागाने मात्र महापौरांच्या पत्राला प्रतिसाद न देत थेट कार्यारंभ केल्याने येणाऱ्या काळात सेना-भाजपमधला वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता https://t.co/PvJtFBvhhG @SerumInstIndia @adarpoonawalla @narendramodi @PMOIndia @CMOMaharashtra #SputnikV #SerumInstituteofIndia #seruminstitute #DGCI #SErumProduceSputnikV
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021
इतर बातम्या
व्होकार्ट हॉस्पिटल अर्धनग्न आंदोलनप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल
TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती
Unlock Updates : वडेट्टीवारांकडन अनलॉकची घोषणा, पुणे आणि नाशिकमध्ये नव्या नियमांनी काय बदल होणार?
(ShivSena vs BJP fight over two Flyover in Nashik)