शंभूराज देसाईंच्या मेहनतीला यश, पाटण तालुक्यात 107 पैकी 68 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींच्या सलग तीन दिवस सुरु असलेल्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पूर्ण झाली (ShivSena win 68 gram panchayat out of 107 from Patan)
दौलतनगर (सातारा) : पाटण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या 119 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने चांगलीच बाजी मारली आहे. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सलग तीन दिवस सुरु असलेल्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पूर्ण झाली. पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीपैकी 68 ग्रामपंचायतींवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची सत्ता आली आहे. 68 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना पक्षाचे 68 सरपंच आणि 67 उपसरपंच विराजमान झाले आहेत. सरपंच, उपसरपंचपदी निवड झालेल्यांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे (ShivSena win 68 gram panchayat out of 107 from Patan).
संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 119 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये पाटण तालुक्यातील 107 तर पाटण मतदारसंघातील सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 12 ग्रामपंचायतींचा समावेश होता. निवडणूका पार पडलेल्या 119 ग्रामपंचायतीपैकी एकूण 75 ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने चांगलीच बाजी मारत पाटण विधानसभा मतदारसंघात एकहाती सत्ता मिळविली आहे (ShivSena win 68 gram panchayat out of 107 from Patan).
पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया 8, 9 आणि 10 फेब्रुवारी अशी सलग तीन दिवस सुरु होती. ही प्रक्रिया आज पूर्ण झाली. ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीच्या प्रक्रियेमध्ये 107 ग्रामपंचायतींपैकी 68 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकविला आहे.
पाटण तालुक्यात एकूण 746 तर सुपने तांबवे पंचायत समिती गणामध्ये 106 असे एकूण 852 उमदेवारांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. यामध्ये 536 उमदेवार हे शिवसेना पक्षाचे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे नेतृत्व मानणारे भरघोस मतांनी निवडून आले. यामध्ये पाटण तालुक्यातील 474 तर सुपने तांबवे गणातील 62 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.
शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकांकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये शंभूराज देसाईंचे आणि शिवसेना पक्षाचे पारडे जड झाले आहे.
‘या’ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे सरपंच-उपसरपंच
बोंद्री, दिवशी खुर्द, घाणबी,वाटोळे, कातवडी, खिवशी,पिपंळोशी,दुसाळे,मालोशी, बांबवडे, आंबळे, मणदुरे, बोडकेवाडी, मंद्रुळहवेली, ठोमसे, आडदेव, त्रिपुडी, नाडोली, कोदळ पुर्नवसन, चोपडी, मुळगांव, कवरवाडी, आंब्रुळे, हावळेवाडी, जरेवाडी, सांगवड, कोरीवळे, शिंदेवाडी, सोनवडे, चोपदारवाडी, वाडीकोतावडे, गोकुळ तर्फ पाटण, आटोली, पाचगणी, आंबेघर तर्फ मरळी, धावडे, पेठशिवापुर, कोकीसरे, तामिणे, सळवे, बाचोली, कोळेकरवाडी, सातर, जानुगडेवाडी, उमरकांचन, धामणी, वाझोली, मस्करवाडी, चव्हाणवाडी धामणी, मोरेवाडी कुठरे, पाचपुतेवाडी, कसणी, निगडे,पवारवाडी, काळगांव, सुपुगडेवाडी, शिद्रुकवाडी,मानेवाडी, काढणे, गुढे, खळे या 61 ग्रामपंचायतीवर थेट सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी झाल्या आहेत.
काहीर, टेळेवाडी, वजरोशी, कामरगांव या 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच तसेच आरक्षणामुळे सरपंचपद रिक्त असल्याने चव्हाणवाडी नानेगांव, खोनोली आणि पाळशी या 3 ठिकाणी तसेच मुरुड, पाठवडे आणि दिवशी बु या तीन ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाचे तीन उपसरपंच अशाप्रकारे 68 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाची सत्ता स्थापन झाली. एकूण 68 सरपंच आणि 67 उपसरपंच हे शिवसेना पक्षाचे विराजमान झाले आहेत. सरपंच, उपसरपंचपदी निवड झालेल्यां सर्वांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विशेष अभिनंदन केले आहे.
कराड तालुक्यातील सरपंच, उपसरपंचाच्या निवडीसंदर्भात स्थगिती असल्याने सुपने तांबवे गणातील 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाच्या निवडी अद्याप झाल्या नाहीत. यामध्ये 12 पैकी 07 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाने गृहराज्यमंत्री देसाईंच्या मार्गदर्शनाखाली सत्ता मिळविली आहे. यामध्ये तांबवे, म्होर्पे, वस्ती साकुर्डी, गमेवाडी, आबईचीवाडी, पाडळी केसे व बेलदरे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
हेही वाचा : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाला मान्यता, किती खाटा वाढणार?