नारायण राणेंचा ‘गड’ उद्धवस्त करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती, ‘मविआ’कडे केली मोठी मागणी

maharashtra assembly election 2024: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. आठ पैकी सात जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील चार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागा उद्धव ठाकरे सेना निवडणूक लढवणार आहे.

नारायण राणेंचा 'गड' उद्धवस्त करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनीती, 'मविआ'कडे केली मोठी मागणी
नारायण राणे उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 12:06 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर युती आणि आघाडींमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामध्ये शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई आणि कोकण महत्वाचे राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या भागाकडे लक्ष दिले आहे. त्यातच कधीकाळी शिवसेनेत असणारे नारायण राणे यांनी कोकणात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सर्वाधिक जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील आठ पैकी सात जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढवणार आहे. त्यामाध्यमातून नारायण राणे यांचा गड उद्धवस्त करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहे.

मुंबई, कोकणावर उद्धव ठाकरे यांचा लक्ष

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरणार असल्याची चिन्ह आहेत. आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपावरील सूत्रानुसार काँग्रेस 100 जागांवर उमेदवार देणार आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी 80 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा 80 जागांवर उमेदवार देणार आहे. इतर जागांवर अजून चर्चा सुरु आहे. त्यात मुंबई आणि कोकणातील सर्वाधिक जागांची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रत्नागिरी- कोकणात जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची सेना मोठा भाऊ ठरणार आहे.

कोकणातील आठ पैकी सात जागा लढवणार

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे. आठ पैकी सात जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील चार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागा उद्धव ठाकरे सेना निवडणूक लढवणार आहे.

हे सुद्धा वाचा

राजन तेली, दीपक केसरकर सामना रंगणार

नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातील तिन्ही जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढणार आहे. त्यामुळे भाजप म्हणजेच नारायण राणे यांना उद्धव ठाकरे शह देणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील 8 पैकी 7 जागांवर उद्धव ठाकरे यांचे शिलेदार लढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस देखील जागा मिळण्यासाठी आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर असा रंगणार सामना आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.