अजित पवार यांना झटका, भाजप, मनसेसह सर्व पक्षांचा बापू भेगडे यांना पाठिंबा

राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बापू भेगडे यांना सर्वच पक्षाने पाठिंबा दिल्याने मावळ मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बापू भेगडे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

अजित पवार यांना झटका, भाजप, मनसेसह सर्व पक्षांचा बापू भेगडे यांना पाठिंबा
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 8:17 PM

मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचा पाठिंबा मिळाला आहे. बाळा भेगडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी ही पाठिंबा दर्शवलाय. हा पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली होती. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळके यांच्या पराभवासाठी बाळा भेगडे मैदानात उतरलेत. शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये.

मावळचे बंडखोर बापू भेगडे यांना आज मनसेने अधिकृतरित्या पाठिंबा दर्शवलाय. महायुतीने सुनील शेळकेंना उमेदवारी दिल्यानंतर सर्वात आधी भाजप, मग शरद पवार गट त्यापाठोपाठ काँग्रेस, ठाकरे गट आणि आता मनसे ही बापू भेगडे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर अनेक मतदारसंघांत बंडखोरी कायम असल्याचं दिसून आलं. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी अनेक इच्छुकांची समजूत काढत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण अनेक ठिकाणी बंडखोरी कायम राहिली.

मावळ मतदारसंघ हा अजित पवारांच्या राष्ट्रावादीला सुटला होता. पण उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. बापू भेगडे यांना आता मनसेने देखील पाठिंबा दिल्याने अजित पवार गटात खळबळ उडाली आहे.

अजित पवार गटाकडून सुनील शेळके मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भेगडे यांना अर्ज भरला. त्यानंतर आज पाठिंबा देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी काढले आहेत. मनसे जाहीर पाठिंबा देत असून मावळमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी असे या पत्रकात म्हटले आहे.

सुनील शेळके यांच्या उमेदवारीला मावळमधील भाजपाच्या नेत्यांचा देखील विरोध होता. त्यामुळे भेगडे यांना भाजपच्या लोकांनी ही पाठिंबा दिला आहे. आता अजित पवार यांच्या उमेदवाराविरोधात भाजप, शरद पवार गट, ठाकरे गट आणि मनसे उभी ठाकणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.