ठाकरे गटाला धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार

विधान परिषदेतील समीकरणे पुन्हा बदलणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एक आमदार कमी झाल्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. ज्याची संख्या जास्त त्यांनी पद, ही सूत्र असल्याचे म्हटले आहे.

ठाकरे गटाला धक्का, राष्ट्रवादीच्या खेळीमुळे परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाणार
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 4:06 PM

चंदन पुजाधिकारी, नाशिक : महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असते. आता शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळली जाणार आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडे असलेले विधान परिषदेती विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. ठाकरे गटातून मनीषा कायंदे शिंदे गटात आल्या आहे. त्याचा परिणाम मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली.

काय म्हणाले अमोल मिटकरी

मनिषा कायंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एकने कमी झाली. आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार असल्याचे वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही केले आहे. 100 टक्के विधान परिषद विरोधी पंख नेते पदावर आम्ही दावा करू, असे ते म्हणाले.

कोणाकडे जाणार पद

विधान परिषदेत संख्या आमची जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद एकनाथ खडसे यांना द्यावं अशी आमची मागणी असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. 2018 साली शिवसेनेकडून मनिषा कायंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या आता ठाकरे गटातून शिंदे गटाकडे गेल्या आहे.

हे सुद्धा वाचा

निवडीपासून होती नाराजी

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून राजकारण पेटले होते. अंबादास दानवे यांनी निवडीचे पत्र दिल्यामुळे काँग्रेस अन् राष्ट्रवादी नाराज होते. यामध्ये त्यावेळी काँग्रेसनेही तर टोकाचीच भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी शिवसेनेने इतर पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे होते, म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण 78 सदस्या आहेत. त्यापैकी भाजपचे 24, शिवसेना 12 (दोन्ही गट) तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10 सदस्या आहेत. तर इतर पक्षांचे सात सदस्य आहेत. विधान परिषदेत 15 जागा रिक्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने केलेला दावा मान्य करण्यात आला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.