Anil Bonde : अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण, अनिल बोंडेंकडून धक्कादायक खुलासा; वाचा काय म्हणाले ते ?

सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस इरफानला संरक्षण देत होता, असेही बोंडे म्हणाले. पोलिसांनी अमरावतीत तातडीने कोंबिंग ऑपरेशन राबविले पाहिजे, असे बोंडेनी म्हटलंय.

Anil Bonde : अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण, अनिल बोंडेंकडून धक्कादायक खुलासा; वाचा काय म्हणाले ते ?
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी अनिल बोंडेंकडून धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 7:58 PM

अमरावती : उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्या प्रकरणात आता खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी धक्कादायक खुलासा (Reveal) केला आहे. उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाइंड लव जिहादचा आरोपी असल्याचे बोंडे म्हणाले आहेत. मास्टरमाइंड शेख इरफान याने एका हिंदू मुलीवर बलात्कार केला. लग्न झालेल्या हिंदू मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या हिंदू मुलीला जबरदस्ती बुरखा घालायला लावला. मध्य प्रदेश पोलिसांनी शेख इरफानवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. अमरावती पोलिसांनी शेख इरफानवर लक्ष न ठेवल्याने उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचा दावा बोंडे यांनी केला आहे.

सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस इरफानला संरक्षण देत होता, असेही बोंडे म्हणाले. पोलिसांनी अमरावतीत तातडीने कोंबिंग ऑपरेशन राबविले पाहिजे, असे बोंडेनी म्हटलंय.

अमरावतीची घटना घटना म्हणजे महाविकास आघाडीचं पाप

याआधी दोन दिवसांपूर्वी अमरावतीची घटना घटना म्हणजे महाविकास आघाडीचं पाप असल्याचं अनिल बोंडे यांनी म्हटलं होतं. अमरावती येथे उमेश कोल्हे नावाचा व्यक्ती आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या दुकानांमधून निघतो आणि त्याचा गळा कापून खून केला जातो. ही घटना म्हणजे महाविकास आघाडीचे पाप आहे, असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. खामगाव येथील एका खाजगी कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते

हे सुद्धा वाचा

हत्येचा सीसीटीव्ही टीव्ही 9 च्या हाती

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अमरावतीचे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी व्हाट्सअप ग्रुपवर पोस्ट व्हायरल केल्या होत्या. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपीला अटक केली असून या हत्याकांड्यांचा तपास आता NIA कडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र ही हत्या जेव्हा झाली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज आता टीव्ही 9 च्या हाती लागले आहे. (Shocking revelation from Anil Bonde in Amravati Umesh Kolhe murder case)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.