श्रीकांत शिंदे यांनी केले उज्जैनच्या महाकाल मंदिरातील नियमांचे उल्लंघन

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्नीसह महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. सर्वसामान्य भाविकांना 50 फूट अंतरावरून दर्शन करावे लागते, तर व्हीआयपींना गर्भगृहात प्रवेश दिला जातो हे अन्यायकारक असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणामुळे व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या विशेष सुविधांवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी केले उज्जैनच्या महाकाल मंदिरातील नियमांचे उल्लंघन
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 5:22 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे त्यांनी पत्नीसह प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. कारण महाकालेश्वरच्या गाभाऱ्यात सर्वांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून हा नियम बनवण्यात आला आहे. पण तरी देखील बाबा महाकालाच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वांना या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा अशी मागणी सर्वसामान्य भाविकांकडून केली जात आहे. व्हीआयपी भाविकांना गर्भगृहात प्रवेश देण्यात आल्याने भाविक संतापले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि श्री महाकालेश्वर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीरजकुमार सिंह यांनी कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.

गर्भगृहात जाऊन बाबा महाकालची पूजा

गुरुवारी सायंकाळी खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नीसह आणि इतर अन्य दोन व्यक्तींसह श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गर्भगृहात जाऊन बाबा महाकालची पूजा केली. नियम मोडल्याने त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबासह गर्भगृहात बाबा महाकाल यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या प्रकरणावर जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की, खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना गर्भगृहात प्रवेश दिला गेला नाही. हे लोक गर्भगृहात कसे पोहोचले याचा तपास केला जाईल.

50 फूट अंतरावरून बाबा महाकालाचे दर्शन

दररोज होणाऱ्या गर्दीमुळे श्री महाकालेश्वर मंदिराची दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. सर्वसामान्य भाविकांना 50 फूट अंतरावरून बाबा महाकालाचे दर्शन दिले जात होते. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार असा नियम बनवण्यात आला होता. तरी व्हीआयपी भाविकांना गर्भगृहातून दर्शन दिले जाते. यामुळे सर्वसामान्य लोकांनी यावर संताप व्यक्त केला. खासदार श्रीकांत शिंदे हे श्री महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात कसे पोहोचले याची माहिती घेण्यासाठी महाकालेश्वर मंदिराचे प्रशासक गणेश धाकड यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद होता.

बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.