डोंबिवली: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयात 60-70 बेड्सचा बालविभाग सुरू करण्यात येणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या रुग्णालयाची पाहणी करून या रुग्णालयाला दहा व्हेंटिलेटर्सही दिले आहेत. (shrikant shinde visited intensive care nursery in dombivli)
डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिकेच्या रुग्णालयात 60 ते 70 बेड्सचा हा बालरोग विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्याची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज केली. यावेळी त्यांनी रुग्णालयाला 10 व्हेंटिलेटर सुद्धा दिले. कचरा कर वसूली संदर्भात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या आरोपावर खासदारांनी आयुक्तांची पाठराखण करत सर्वानी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असा सल्ला दिला.
कोरोनाचा धोका ओळखून लहान मुलांसाठी हायफ्लो यंत्रणा उभारण्यासाठी व ज्या मुलांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे. त्यांना समर्पित नवजात आयसीयूमध्ये ठेवले जाते. त्यांच्याकरीता एनआयसीयू युनिट अत्याधुनिक असते. प्रत्येक नवजात शिशू वेगळा असतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. नवजात शिशू देखभाल युनिट, ज्याला इंटेन्सिव्ह केअर नर्सरी देखील म्हटले जाते. त्यासाठी खासदार शिंदे यांनी 1 कोटी 25 लाख रुपयांचा खासदार निधी दिला आहे.
या इंटेन्सिव्ह केअर नर्सरीसाठी डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात 60 ते 70 बेड्सचा बालरोग विभाग, 10 बेडचा अतिदक्षता विभाग, 10 बालरोग व्हेंटिलेटर, बालरोग उपकरणे, प्राणवायू वाहिन्या आदींनी हा बालरोग विभाग सुसज्ज असावा, असे निर्देश शिंदे यांनी महापालिकेला दिले आहेत. हा विभाग कोरोनाकाळा पूरता राहणार नाही तर त्यानंतरही हा विभाग कार्यान्वित असेल. बालकांच्या उपचारासाठी कायम स्वरुपी हा विभाग तयार होईल. त्याचा फायदा केवळ शहरी भागातील बालकांच्या उपचारासाठी होणार नसून आसपासच्या ग्रामीण भागातील बालकांच्या उपचारालाही हा विभाग पूरक ठरणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
खासदार शिंदे यांनी माजी नगरसेवक रमेश जाधव, रमेश म्हात्रे, राजेश कदम, राजेश मोरे यांचा सोबत डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी दहा व्हेंटिलेटर महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना सूपूर्द केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून आलेला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आयुक्तांकडे आले होते. मात्र, कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याचे कारण देत आयुक्तांनी त्यांना भेट नाकारली होती. मात्र, आज या कार्यक्रमाला अधिक कार्यकर्ते असातनाही आयुक्तांनी काहीच भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (shrikant shinde visited intensive care nursery in dombivli)
VIDEO :SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 25 May 2021https://t.co/7JLqlK1AXc
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या:
रस्त्याच्या पलिकडचा बॉल पकडण्याचा प्रयत्न, कचऱ्याच्या ट्रकने चिमुकल्याला चिरडलं
ATS प्रमुख जयजीत सिंग यांच्या बदलीची चिन्हं, ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्तीची शक्यता
ठाण्यात म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांच्या टीमला मोठं यश
(shrikant shinde visited intensive care nursery in dombivli)