ठाकरे पिता-पुत्रांना कारागृहात टाकण्याचा डाव, अंनिसचे श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप, त्या चार प्रतिज्ञापत्रांची भानगड काय?

aditya thackeray uddhav thackeray: या प्रकरणात अनिल देशमुख यांनीही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, श्याम मानव यांनी जे सांगितले ते सत्य आहे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यास सांगितले होते.

ठाकरे पिता-पुत्रांना कारागृहात टाकण्याचा डाव, अंनिसचे श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप, त्या चार प्रतिज्ञापत्रांची भानगड काय?
aditya thackeray uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 12:01 PM

राज्यातील चार बड्या नेत्यांना कारागृहात टाकण्याचा डाव आखण्यात आला होता. त्यात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामार्फत या चौघांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु अनिल देशमुख यांनी त्या चार प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही, यामुळे हे चौघे नेते वाचले आणि अनिल देशमुख कारागृहात गेले, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

काय होते ते प्रतिज्ञापत्र

श्याम मानव यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपये जमा करण्यास मला सांगितले होते, असे प्रतिज्ञापत्र अनिल देशमुख यांना दिले. दुसरे प्रतिज्ञापत्र आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात होते. त्यात दिशा सालियान प्रकरणात अडकवण्यासंदर्भात होते. परंतु अनिल देशमुख यांनी खूप विचार केला. त्यांच्याकडे आलेल्या या चार प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले. तिसरे प्रतिज्ञापत्र अनिल परब तर चौथे प्रतिज्ञापत्र अजित पवार यांच्यासंदर्भात होते.

हे सुद्धा वाचा

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याकडे अंमलबाजावणी संचालनालयच्या (ईडी) कारवाईपासून वाचवण्यासाठी निरोप दिला जातो. त्यानुसार त्यांना सांगितले गेले की, आम्ही तुमच्याकडे चार प्रतिज्ञापत्र पाठवलेले आहेत. यावर सही केल्यास तुमची ईडी कारवाईतून सुटका होईल. परंतु त्यांनी सही केली नाही, असे श्याम मानव यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले प्रतिज्ञापत्र

या प्रकरणात अनिल देशमुख यांनीही भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, श्याम मानव यांनी जे सांगितले ते सत्य आहे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यास सांगितले होते. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र त्यांनी लिहून एका व्यक्तीमार्फत माझ्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले होते. परंतु आपण आयुष्यभर कारागृहात राहू, परंतु कोणावर खोटा आरोप करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

हे ही वाचा

राज्यातील राजकारण खळबळ, अजित पवार यांना अडकवण्यासंदर्भात अनिल देशमुखांकडे ते प्रतिज्ञापत्र कोणी पाठवले?

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.