मी जे बोललो ते खरं आहे आणि त्या मतावर मी ठाम आहे – श्याम मानव
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर श्याम मानव यांनी ही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मला कोण विकत घेऊ शकतं का हे फडणवीसांना चांगले माहित आहे. फडणवीस यांनी म्हटले होते की, श्याम मानव हे सुपारी बाजांच्या नादी लागले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर श्याम मानव यांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे. ‘माझ्या अनुभवानुसार एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली तर कुठले पुरावे पहावे, त्यावर किती विश्वास ठेवावा, हे माहित आहे. मी खोटं बोलत नाही, मांडणी करत नाही. हे पाहिल्यादा बोललो नाही. 34 सभेत हे मागील काही दिवसांपासून बोलत आहे. मला कोणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी बोलीन असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? देवेंद्र फडणवीस यांना चांगली कल्पना आहे मला कोणी विकत घेऊ शकता का? इमर्जन्सी मध्ये इंदिरा गांधींचा विरोध केला असताना संघाचे लोक तसेच देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या सोबतही काम केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल मी विचार करून बोललो. जे बोललो त्यावर ठाम आहे.’
‘लोकसभेत जनजागृती केली. विधानसभेत जनजागृती करेल. देवेंद्र फडणवीस यांना तासंतास भेटण्यासाठी वाट पाहली आहे. अनिल देशमुख यांच्याकडे असलेले पुराव्याबद्दल खात्री असल्यानं बोललो आहे. सरकारवर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो. राजकारणात पडत नसल्याचं श्याम मानव म्हणाले आहेत.’ असं ही श्याम मानव म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे.‘श्याम मानव इतक्या वर्षांपासून मला ओळखतात. त्यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. आता इको सिस्टममध्ये सुपारीबाज लोकं घुसले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव त्यांच्या नादी लागले का? अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागले तेव्हा महाविकासआघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागल्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करायला लावला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. ते काय सुटले नाहीत. ते जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीयेत. १०० कोटीच्या वसुली केसमध्ये ते बेलवर बाहेर आहेत. ते सातत्याने आरोप करताय मी शांत आहे. मी अशा प्रकारे राजकारण करत नाही. मी कोणाच्या नादी लागत नाही. कोणी नादी लागलं तर सोडत नाही.’