मुंबईः अजित पवार यांच्या जरंडेश्वर घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्ममाकर मुळे यांचीही नावे आहेत. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. हिम्मत असेल, तर माझ्या आरोपाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकरांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
घोटाळ्याची कागपत्रे आहेत
सोमय्या म्हणाले, चोरी केली नाही तर आनंद अडसूळ का लपून बसलेत. आता मी आणखी एक नाव वाढवत आहे. मी अर्जुन खोतकरांच्या जालना सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढला आहे. खोतकरांनी स्पष्टीकरण दिलेय की त्याचा आणि माझा संबंध काय. मात्र, माझ्याकडे त्याची कागदपत्रे आहेत. जालना साखर कारखान्याचा मालक अर्जुन इंडस्ट्रीज आहे. त्याचे मालक कोण आहेत. 2018 ला अर्जुन शुगर इंडस्ट्रीजची स्थापना अर्जुन खोतकर यांनी केली, असा दावाही त्यांनी केला. सोमय्या म्हणाले, फेब्रुवारी 2012 ला कारखाना आजारी पडला. त्याचे टेंडर 28 फेब्रुवारीला निघाले. निविदा तापडिया कंपनीच्या नावाने दिली गेली. या कंपनीने कारखाना विकत घेताना बांधकाम करणार म्हणून ताब्यात घेणार म्हटले. 42 कोटी 18 लाख 62 हजारांत विकत घेतला. हिम्मत असेल, तर मुख्यमंत्री आणि अर्जुन खोतकरांना उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
पद्माकर मुळेंही सहभागी
सोमय्या पुढे म्हणाले की, जे महाराष्ट्र सहकारी बँकेला भरले ते पैसे कोणी दिले ? 10 जूलै 2020 ला जे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांना दिले त्याचे पैसे हे अर्जुन खोतकरांनी दिलेत, असे तापडिया कंपनीने सांगितले. 23 नोव्हेंबरला 2012 ला आम्ही 43 कोटी रुपयांना कारखाना विकला. जे जरंडेश्वर कारखान्यांत अजित पवारांनी केले तेच खोतकरांनी केले आहे. यात 6 शेअर होल्डर आहेत. 6 पैकी 5 जण खोतकर परिवारातील आहेत. 6 वं नाव आहे अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. जालना साखर कारखान्यांचे दोन मालक आहेत. अर्जुन खोतकर, पद्माकर मुळे आणि दुसरे नाव रुपाली विश्वास नांगरे-पाटील. नांगरे-पाटील म्हणजे मुंबई पोलीसचे सहआयुक्त अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
सीबीआय चौकशीची मागणी
अर्जुन खोतकरांच्या या साखर कारखान्याची चौकशी बंद केली गेली. मुंबई पोलिसांनी बंद करून रिपोर्ट कोर्टाला दिला. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली. विश्वास नागरे पाटलांचे सासरे आणि अर्जुन खोतकर 950 कोटींचे मालक आहेत. त्यांनी हा कारखाना बेनामी पद्धतीने का विकत घेतला, असा सवाल त्यांनी केला. याअर्जुन शुगर इंडस्ट्रीजची चौकशी करण्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे. ईडीचे अधिकारी, सहकार मंत्रालयात जाऊन भेट घेणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारhttps://t.co/uuaiLJG8bv#Nashik|#SahityaSammelan|#ChiefMinisterUddhavThackeray|#GuardianMinisterChhaganBhujbal|#NovelistVishwasPatil|#LyricistJavedAkhtar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2021
इतर बातम्याः