नऊ महिने भरले, प्रसुती तोंडावर; कणकवलीच्या आशा सेविकेचे ‘कोरोना सर्व्हे’ला प्राधान्य
मातृत्वाची घटिका भरण्याचा कालावधी जवळ येऊन ठेपला असताना देशात 'कोरोना' विषाणूचे संकट उभे राहिले. मात्र प्रसुतीच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले. (Sindhudurg Aasha Worker Corona Survey During Pregnancy)
सिंधुदुर्ग : आपल्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल लागून नऊ महिने उलटले, प्रसुतीचा काळ जवळ आला, तरीही ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी आशा स्वयंसेविकेने ‘कोरोना व्हायरस’ संदर्भात घरोघरी जात सर्व्हे केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वागदे येथील आशा स्वयंसेविका श्रद्धा यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम ठोकला जात आहे. (Sindhudurg Aasha Worker Corona Survey During Pregnancy)
श्रद्धा या कणकवली वागदे येथील आशा स्वयंसेविका आहेत. कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वागदे उपकेंद्र यांच्या अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत 2009 पासून त्या आशा स्वयंसेविकेचे काम करत आहेत.
श्रद्धा गरोदर होत्या. त्यामुळे त्यांच्यावर स्वतःसोबतच गर्भातील बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी होती. मातृत्वाची घटिका भरण्याचा कालावधी जवळ येऊन ठेपला असताना देशात ‘कोरोना’ विषाणूचे संकट उभे राहिले. मात्र प्रसुतीच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले.
हेही वाचा : गुड न्यूज! औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह
श्रद्धा यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन कोणाला सर्दी, खोकला, ताप अशी ‘कोरोना’ची लक्षणं आहेत का, याची माहिती घेतली. कामानिमित्त जिल्ह्याबाहेर असलेल्या व्यक्ती गावी आल्या आहेत का? याचा सर्व्हे बाळंतपणाच्या दोन दिवस आधीपर्यंत त्या करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
खरंतर गरोदर असल्याचं कारण देत त्या ही जबाबदारी टाळू शकल्या असत्या. पण त्यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि पार पाडलेली जबाबदारी अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. त्यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भिवंडीतून मध्य प्रदेशात चालत निघालेल्या कामगाराला कसारा घाटात हार्टअटॅक https://t.co/bZYFVrNsFE
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2020
(Sindhudurg Aasha Worker Corona Survey During Pregnancy)