संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित मनिष दळवी विजयी, राजन तेली पराभूत; भाजपचा 8 तर महाविकास आघाडीचा 5 जागांवर विजय
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
सिंधुदुर्ग: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचा आतापर्यंत 8 आणि महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांचा विजय झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला आहे.
आघाडीला मोठा धक्का, सावंत पराभूत
तसेच महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आहेत. सावंत हे माजी अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
निकाल काय
1. शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका
प्रकाश गवस (भाजप) पराभूत गणपत देसाई (महावि. आघा.) विजयी
२. शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका
प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत विद्याप्रसाद बांदेकर (महावि. आघा.)- विजयी सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत
३. शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका
प्रकाश बोडस (भाजप)- विजयी अविनाश माणगावकर (महावि. आघा.)- पराभूत
4. शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका
सतीश सावंत (महावि. आघा.)- पराभूत
विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी
5. मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ
महेश सारंग (भाजप)- विजयी मधुसूदन गावडे (महावि. आघा.)- पराभूत
6. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ
अतुल काळसेकर (भाजप)- विजयी सुरेश दळवी (महावि. आघा.)- पराभूत
7. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ
राजन तेली (भाजप)- पराभूत सुशांत नाईक (महावि. आघा.)- विजयी
8. विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था
विनोद मर्गज (महावि. आघा.)- पराभूत संदीप परब (भाजप)- विजयी
9. कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ (एकुण मतदान)
विकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत समीर सावंत (भाजप)-विजयी
10. शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी
दिलीप रावराणे (भाजप) विजयी दिगंबर पाटील (महावि. आघा.)- पराभूत
11. भाजपचे मनिष दळवी विजयी महाविकास आघाडीचे विलास गावडेंचा पराभव
कणकवलीत जल्लोष
दोन्ही निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने राणे समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. राणे समर्थकांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष सुरू केला आहे. तर, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शुकशुकाट पसरला आहे.
39 उमेदवार रिंगणात
जिल्हा बँकेसाठी 98 .67 टक्के मतदान झाले असून 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मतमोजणी सुरु झाली असून राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये आठ टेबलांवरती एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जाईल. मतमोजणीचा निकाल यायला जवळपास दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.
Video : Nitesh Rane Poster | ‘नितेश राणे हरवले आहे’ मुंबईतील पोस्टरबाजी राणेंना डिवचणारी – tv9#NiteshRane #Mumbai #Poster pic.twitter.com/J0LfXSs5x7
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2021
संबंधित बातम्या:
Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत ‘तेजा’ मिरचीची ची तेजी, तब्बल 200 एकरात लाल मिरचीचे वाळवण