प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी निलेश राणेंचा मोठा दावा, म्हणाले “दोन वर्षांपूर्वी…”
सिंधुदुर्गात प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर आरोप केल्यानंतर निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी नाईक आणि सिद्धेश शिरसाट यांच्यातील संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सध्या सिंधुदुर्गात प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी याप्रकरणी थेट राणे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांना निलेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणेंनी सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईकांचा एकत्र असलेला फोटो दाखवत 2009 पासून दोघांचे सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे. तसेच, वैभव नाईकांचा सिद्धेश सिरसाटशी संबंध आहे का, असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच वैभव नाईक लवकरच तुरुंगात जातील, असा दावाही निलेश राणेंनी केला आहे.
“वैभव नाईकांना या प्रकरणाची २ वर्षांपूर्वी माहिती होती तर पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही? तो व्हिडीओ 2019 चा आहे आणि 2023 ला जर बिडवलकर गेला असेल तर त्याबद्दल एसपींनी चौकशी करावी. या प्रकरणात 100 टक्के वैभव नाईक यांचा हात आहे. तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला जेलची हवा खावी लागेल, मीच आता आंदोलन करणार आहे”, असा इशाराही निलेश राणेंनी दिला.
“वैभव नाईक आणि सिद्धेश शिरसाट यांचे संबंध आहेत का? सिद्धेश शिरसाट वैभव नाईकांना पैसे द्यायचा का? वैभव नाईकांनी बिडवलकर हत्या प्रकरणातील माहिती लपवली का? असे अनेक सवाल निलेश राणेंनी केले आहे. यावेळी निलेश राणेंनी वैभव नाईक आणि आरोपी सिद्धेश सिरसाटसोबत फोटो दाखवत आरोप करण्यात आले. वैभव नाईक ड्रग्जवाल्यांकडून पैसे घेतात का?” असे सवाल करत निलेश राणेंनी वैभव नाईकांच्या आरोपांचे खंडन करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांना गुन्ह्याची माहिती का दिली नाही?
“याप्रकरणी 9 एप्रिलला केस फाईल झाली, त्याआधी डिजीटल न्यूज चॅनलवर बातमी कशी आली? दोन वर्षांपूर्वी दबक्या आवाजात केस होती, मग वैभव नाईकांनी तेव्हाच आवाज का उठवला नाही? वैभव नाईकांनी 14 एप्रिल 2025 (व्हिडिओमध्ये दिलेली तारीख) चा व्हिडिओ बिडवलकरचा टाकला, पण पोलिसांकडे का गेले नाहीत? 16 एप्रिलला पोलिसांकडे गेले, पण पोलिसांना गुन्ह्याची माहिती का दिली नाही? पोलिसांनी गुन्ह्याची माहिती द्यायची असते. मालती चव्हाण या नावासकट तक्रार असणार आहे.
तुमच्याकडे क्राइमबद्दल अगोदरपासून माहिती होती. जर माहिती होती मग तुम्ही लपवलतं का? सिद्धेश शिरसाट तुम्हाला गप्प बसण्याचे पैसे द्यायचा का? सिद्धेश शिरसाटवर आरोप करण्यासाठी पैसे दिलेलं होते. मागच्या दहा वर्षापासून धंदे करत असल्याचं पाहायला मिळतं. वैभव नाईक बनवत असल्याचं पाहायला मिळते. सरकार गेलं आरोप करायला लागलेले आहेत. तुमचा सल्लागार बिनडोक आहे”, असा आरोप निलेश राणेंनी केला.
सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात खळबळ
“माझी पोलिसांना पण विनंती आहे की हा स्टेट फाँरवर्ड़ क्राइम आहे. वैभव नाईकांना बाँडी कुठे माहितीय? एसपी दोन वर्षा पूर्वीची मर्डर मिस्ट्री तुम्ही सोडवली. ड्रग्जवाले तुम्हाला पैसे देतात का वैभव नाईक ? ड्रग्सचा पैसा तुम्ही लपवून ठेवला हाचं एक क्राइम होता. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही तो पोलिसांना का दिलेला आहे. वैभव नाईकांचं चीपी विमानतळाला टाळ लावणारं होते. बिडवलकरची केस दोन वर्षापूर्वी होती. तुम्ही सिद्धेश सिरसाट आणि माझा संबंध जोडायचं काम का करत आहात? आमच्यासारखे 200 लोकांना भेटत असतो. कुठला माणूस दोन नंबरवाला मर्डर करून आलाय कसं कळेलं. मी सव्वा वर्षानंतर पक्षात आलो आहे. सिद्धेश सिरसाट दोन नंबरचा माणूस आहे, हे मला कसे कळणार?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या आरोपांमुळे सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.