नवीन वर्षांत उद्धव ठाकरे यांना पुण्यातून मोठा धक्का, शिवसेना यूबीटीचे पदाधिकारी करणार ‘जय महाराष्ट्र’

Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे यांचे पुण्यात लक्ष नाही. त्यामुळे माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यातील पाच जणांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व जण मुंबईत पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

नवीन वर्षांत उद्धव ठाकरे यांना पुण्यातून मोठा धक्का, शिवसेना यूबीटीचे पदाधिकारी करणार 'जय महाराष्ट्र'
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 9:20 AM

Uddhav Thackeray Shivsena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे यांना नवीन वर्षांत जोरदार धक्का बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. पुणे येथील पाच माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडणार आहे. ते सर्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असणार आहे.

पालिका निवडणुकीत होणार अडचण

पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपकडून हा झटका उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्य सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चा बांधणी करण्यास लागले आहे. त्यावेळी शिवसेना उबाठाला पुण्यात धक्का बसणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

काय आहे या नेत्यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांचे पुण्यात लक्ष नाही. त्यामुळे माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यातील पाच जणांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व जण मुंबईत पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांच्यासह आणखीन चार नगरसेवकांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यांचे केवळ २० आमदारच निवडून आले. त्याचवेळी राज्यातील त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. या परिस्थिती स्थानिक पातळीवर नेते पक्ष सोडत असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.