NashikGold: भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, सोनं झालंय स्वस्त, धनतेरस पावणार!
दिवाळीतला दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि अक्षयतृतीया या दिवशीही सोने खरेदी करायला अनेक जण प्राधान्य देतात.
नाशिकः धनत्रयोदशीदिवशी आज नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये नोंदवले गेले.
दिवाळीतला दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. पाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि अक्षयतृतीया या दिवशीही सोने खरेदी करायला अनेक जण प्राधान्य देतात. सध्या दिवाळीनिमित्त नाशिकच्या सराफा बाजारात पिवर म्हणजेच 24 कॅरेट सोन्याला मागणी वाढली आहे. दरातही किरकोळ चढउतार सुरू आहे. नाशिकमध्ये 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. आज मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये आणि चांदीचे दर किलोमागे 65 हजार 500 रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. शिवाय सायंकाळपर्यंत बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होईल, असा अंदाज त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.
भाव वाढण्याचा अंदाज
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धनत्रयोदशीदिवशी आज नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये आणि चांदीचे दर किलोमागे 65 हजार 500 रुपये नोंदवले गेलेनोंदवले गेले. बाजारपेठेत आज मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन
इतर बातम्याः
VIDEO l SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 November 2021https://t.co/GUhMUwZ9M4#SuperFastNews #GaonSuperfast #Superfast50Gaon50Batmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2021