VIDEO | 300 खिळे, अनोखं नक्षीकाम आणि 15 किलो वजन, कोल्हापुरी चप्पल वापरणाऱ्या ‘दाजीं’ची देशात हवा

सोलापूरच्या एका 75 वर्षीय आजोबांच्या कोल्हापूर चपलांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर रंगली आहे. (Solapur Daji Dolatade 15 kg Kolhapuri chappal)

VIDEO | 300 खिळे, अनोखं नक्षीकाम आणि 15 किलो वजन, कोल्हापुरी चप्पल वापरणाऱ्या 'दाजीं'ची देशात हवा
कोल्हापुरी चप्पल वापरणाऱ्या 'दाजीं'ची देशात हवा
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 3:27 PM

सोलापूर : चप्पल म्हटलं की आपल्या साधी घरात घालण्यासाठी किंवा साधारण फिरण्यासाठी वापरण्यात येणारी असा समज असतो. पण सोलापूरच्या एका 75 वर्षीय आजोबांच्या कोल्हापूर चपलांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर रंगली आहे. दाजी दोलतडे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते अगदी लहानपणापासूनच वेगवेगळ्या बांधणीच्या चप्पल वापरतात. आता या वयात देखील ते तब्बल 15 किलो वजनाच्या कोल्हापुरी चपला वापरतात. (Solapur 75 years old Daji Dolatade use 15 kg Kolhapuri chappal)

कोल्हापुरी चपला वापरण्याचा छंद

माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी हे एक दुष्काळग्रस्त गाव आहे. माळरानावर वसलेल्या या गावातील दाजी दोलताडे यांना पहिल्यापासून कोल्हापुरी पद्धतीच्या चपला वापरण्याचा छंद आहे. पुढे जाऊन त्यांनी हा छंद अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवला आहे. दाजी दोलतडे यांनी शोले चित्रपट पाहिला आणि त्यातील गब्बरसिंगचे बूट पाहिले. त्याचे वजनदार बूट पाहून आपणही वजनदार चपल्या वापराव्या असा निश्चय त्यांनी केला.

त्यानंतर यांनी कोल्हापुरी पद्धतीच्या पाच किलो वजनाच्या चपला तयार करून घेतल्या. यानंतर पुढे त्यांनी त्या चपलांचे वजन वाढवत नेऊन 15 किलोपर्यंत नेऊन ठेवले. विशेष म्हणजे कोल्हापुरी वजनदार चपलेचा एक जोड बनवण्यासाठी त्यांनी 25 हजार रुपयांचा खर्च केला.

चपलांचे वैशिष्ट्यं काय?

या कोल्हापुरी पद्धतीच्या चपलावर 50 घुंगरे, लाइटींग, नक्षीकाम, 400 रिबिटचे गुंफण, चपलांना मजबुती आणण्यासाठी 300 खिळे, 12 तळी कातडे, 4 नट बोल्ट अशी बांधणी केली आहे. त्यामुळे या चपलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. याच वजनदार चपला घालून महाराष्ट्रभर ते कर्र ..कर्र.. आवाज काढत फिरत असतात. त्यामुळे चपला हीच त्यांची ओळख बनलेली आहे. आज 75 वर्षाच्या वयातही ते याच 15 किलो वजनाच्या चपला घालून फिरत असतात. (Solapur 75 Old Daji Dolatade use 15 kg Kolhapuri chappal)

संबंधित बातम्या : 

Gold latest price : 1 वर्षात निचांकी पातळीवर पोहोचलं सोनं, मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमती वाढणार

VIDEO : मनमोहक समुद्र किनारा, धनश्रीचा डान्स, युजवेंद्र चहलचेही ठुमके, पंजाबी गाण्यावर दिग्गज थिरकले

अरेरे! बापलेकाच्या भांडणात बिचाऱ्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.