बापरे! 3 वर्षांच्या चिमुकलीला लावलेल्या सलायनमध्ये चक्क झुरळ, रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील डॉ. जगदाळे मामा रुग्णालयात निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय चिमुकलीला 27 ऑगस्टला ब्राँकायटिस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

बापरे! 3 वर्षांच्या चिमुकलीला लावलेल्या सलायनमध्ये चक्क झुरळ, रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघड
cockroach in saline
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 1:52 PM

सोलापूरः स्वयंपाकगृहात झुरळ आढळणं यात काही नवीन नाही, बऱ्याच गृहिणी या झुरळांच्या त्रासाला कंटाळूनच घरात पेस्ट कंट्रोलही करून घेतात. पण रुग्णालयातील सलायनमध्ये झुरळ आढळलेलं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण हे खरं आहे. सोलापुरातील एका रुग्णालयात सलायनमध्ये चक्क झुरळ आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. रुग्णांच्या जिवांशी कशा पद्धतीनं खेळ सुरू आहे, याचा प्रकारातून उलगडा झालाय.

बार्शीतील डॉ. जगदाळे मामा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील डॉ. जगदाळे मामा रुग्णालयात निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय चिमुकलीला 27 ऑगस्टला ब्राँकायटिस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ दखल घेत तिला सलायनही चढवले. मात्र त्यातील सलायन ठरावीक कालावधीनंतर नंतर बंद पडत होते, त्यानंतर त्या सलायनची तपासणी केल्यावर त्यात चक्क झुरळ असल्याचं दिसून आलं, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडालीय.

…म्हणून त्या चिमुकलीचा जीव बचावला

डॉक्टर आणि परिचारिकांनी तात्काळ दखल घेत ते सलाईन बंद केले. त्यामुळे त्या चिमुकलीवरच्या जिवाचा संभाव्य धोका टळला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला, मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून उडवाडावीची उत्तर देण्यात आली. दरम्यान, निहिरा पुराणिक हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, तिची तब्येत सध्या व्यवस्थित आहे. पण रुग्णांच्या आरोग्यसोबत होणारा हा खेळ कधी थांबणार हाच प्रश्न आता सामान्य सोलापूरकर विचारत आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्हेंटिलेटरमध्ये चक्क झुरळ सापडलं

गेल्या काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्हेंटिलेटरमध्ये चक्क झुरळ सापडलं होतं.  वेटिंलेटरमध्ये झुरळ आढळल्याच्या या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओही समोर आला होता. विषबाधा झालेल्या एका महिलेला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. याच व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या निमित्ताने वैद्यकिय महाविद्यालयात मोफत आणि माफक दरातल्या दर्जाहीन सुविधा चव्हाट्यावर आल्या होत्या. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच पेशंटच्या मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.

इतर बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर 13 वर्षांत 2500 बळी, महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मनसेचे थेट गडकरींना पत्र

नवी मुंबईत झोपडपट्टी परिसरांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतीच

solapur barshi cockroaches in a three year old girl saline, Hospital negligence revealed

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.