Corona | सोलापुरात कोरोनाचा कहर, 32 दिवसात 300 रुग्णांचा टप्पा पार, आठवड्याला सरासरी 70 नवे रुग्ण

अवघे तीस दिवस कालावधी पूर्ण केलेल्या कोरोनाने सोलापुरात कहर करत सरासरी दररोज दहाच्या वेगाने तीनशे रुग्णांचा टप्पा पूर्ण केला आहे.

Corona | सोलापुरात कोरोनाचा कहर, 32 दिवसात 300 रुग्णांचा टप्पा पार, आठवड्याला सरासरी 70 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 3:47 PM

सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे (Solapur Corona Cases Increases). मात्र, महिन्याभरापूर्वी एकही रुग्ण नसलेल्या सोलापूरने तब्बल 300 रुग्णांचा टप्पा पार केला आहे. सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढ ही सोलापुरकरांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. सोलापुरात अवघ्या 32 दिवसात तब्बल 308 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनावर आळा कसा घालावा, हे मोठं आव्हान (Solapur Corona Cases Increases) सध्या प्रशासनापुढे आहे.

अवघे तीस दिवस कालावधी पूर्ण केलेल्या कोरोनाने सोलापुरात कहर करत सरासरी दररोज दहाच्या वेगाने तीनशे रुग्णांचा टप्पा पूर्ण केला आहे. तर आतापर्यंत तब्बल 21 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्येही वाढत होत आहे.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रवेश झाला, कोरोनाचं थैमान सुरु असताना सोलापूर शहरात मात्र त्याचा शिरकाव झालेला नव्हता. सोलापुरात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरु असताना 13 एप्रिल रोजी तेलंगी पाछा पेठ येथे पहिला रुग्ण आढळला. त्याच्या मृत्त्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाने हाथपाय पसरले आहेत. आता सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 308 वर पोहोचली आहे. तर 21 जणांचा त्यात मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे 84 जण आतापर्यंत कोरोनावर मात करण्यात यशस्वी (Solapur Corona Cases Increases) झाले आहेत. मात्र रुग्णाची संख्या वाढतच आहे.

ज्या 21 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील 26 वर्षीय महिलेचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व हे 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आहेत. त्यामुळे 50 वर्षावरील लोकांना कोरोनाने लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शिवाय मृत लोकांना कोरोनापूर्वी कोणता ना कोणता आजार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

शहरातील चारही भागात आता रुग्ण आढळल्यामुळे शहराच्या प्रत्येक बाजूला आता प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहेत. तेलंगी पाछा पेठ, बापूजी नगर, गवळी वस्ती , शास्त्रीनगर अशा दाट लोकवस्तीच्या भागातील रुग्णाची संख्या वाढत असतानाच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे कोरोनाचा प्रवास आता विरळ लोकवस्तीच्या परिसराकडेही सुरु झाला आहे.

कधी किती रुग्ण आढळले?

– सोलापूर शहरात पहिल्या आठवड्यात म्हणजे 13 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत – 15 रुग्ण

– दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 20 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत – 46 रुग्ण

– तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 27 एप्रिल ते 3 मेपर्यंत – 68 रुग्ण

– चौथा आठवडा म्हणजे 4 मे ते 10 मेपर्यंत – 52 रुग्ण

पाचवा आठवडा 11 मे ते 14 मे रोजी – 44 रुग्ण

Solapur Corona Cases Increases

संबंधित बातम्या :

Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 55 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ

Maharashtra Corona Patient | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर, मुंबई, पुण्यासह कुठे किती रुग्णांची वाढ?

Malegaon Corona | राजेश टोपेंसोबत बैठक सुरु असतानाच रिपोर्ट आला, मालेगावचे मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

Ratnagiri Corona | कोकणात प्रवेशापूर्वी चाकरमान्यांची तपासणी होणार, कशेडी घाटात वाहनांची गर्दी

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.