सोलापुरात कोरोनाविरोधात लढताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाबळींचा आकडा वाढत चालला आहे (Solapur Corona death update). त्यात आता कोरोनाने पोलिसांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे.

सोलापुरात कोरोनाविरोधात लढताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 10:49 PM

सोलापूर : राज्यात कोरोनाबळींचा आकडा वाढत चालला आहे (Solapur Corona death update). त्यात आता कोरोनाने पोलिसांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. सोलापुरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरात पोलिसाचा पहिला कोरोना बळी आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे (Solapur Corona death update).

सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाविरोधात लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. पोलीस महासंचालक आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीसच्या ट्विटर हॅण्डलवर देण्यात आली आहे.

राज्यात आज दिवसभरात तब्बल 38 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 495 वर पोहोचली आहे. यामध्ये 50 अधिकारी आणि 445 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं काल समोर आलं होतं.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने पाच पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांवर हल्ले

एकीकडे पोलिसांना कोरोनाची लागण होत असताना, दुसरीकडे पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाणही वाढलं आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. आतापर्यंत 184 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. या प्रकरणी 663 हल्लेखोर नागरिकांना अटक करण्यात आली आहे. काल तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. आता पर्यंतच्या हल्ल्यात 72 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी आहेत.

95 हजार गुन्हे दाखल

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यभरात 95 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 18 हजार नागरिकांना अटक झाली आहे. याशिवाय 53 हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून तीन कोटी 51 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Upadte | राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1,233 नवे रुग्ण, आकडा 17 हजारच्या उंबरठ्यावर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.