पुणे, मुंबई नव्हे तर राज्यातील या शहरात देशातील सर्वाधिक पॅकेज
salary package: वार्षिक पगाराच्या राज्यानुसार आकडेवारीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत आहे. पुरुषांचा सरासरी पगार 19,53,055 रुपये तर महिलांचा सरासरी पगार 15,16,296 रुपये आहे. मॅनेजमेंट आणि कमर्शियल इंडस्ट्रीजमध्ये भारतात सर्वाधिक पगार मिळतो.
मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद किंवा नवी दिल्ली या शहरात नोकरी करण्याचे उच्च शिक्षित तरुणांचे स्वप्न असते. कारण या शहरांमध्ये चांगल्या कंपन्या आहेत. तसेच या शहरांमध्ये पगार सर्वाधिक मिळतो. परंतु तुमचा हा अंदाज चुकणारा आहे. देशात सर्वाधिक पगार देशातील या टिअर 1 शहरात नाही तर महाराष्ट्रातील टिअर 2 शहरात मिळत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहराने मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद आणि नवी दिल्ली या बड्या शहरांना पगाराच्या बाबतीत मागे टाकले आहे. देशात सर्वाधिक पगार मिळणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख झाली आहे.
काय आहे हा सर्व्हे?
महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर आणि जिल्हा टॉवेल, चादरी निर्माण करणार आहे. या शहरातील चादरी देशभर प्रसिद्ध आहे. परंतु काळाप्रमाणे शहरात बदल होऊ लगाले आहे. इतर उद्योग शहरात आले आहेत. आता देशातील सर्वाधिक सरासरी पगार देणारे शहर म्हणून सोलापूर पुढे आले आहे. हा सकारात्मक बदल आश्चर्यकारक आहे.
सोलापूरमध्ये वार्षिक पगार 28,10,000 रुपये
सोलापूर शहराने दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर आणि हैदराबादसारख्या टिअर 1 शहरांना मागे सोडले आहे. एका सर्व्हेनुसार, सोलापूरमध्ये वर्षाचा सरासरी पगार 28,10,000 रुपये आहे. सोलापूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. मुंबईत सरासरी वार्षिक पगार 21.17 लाख रुपये आहे. बंगळूरमध्ये सरासरी वार्षिक पगाराची रेंज 21.01 लाख रुपये आहे. दिल्लीत 20.43 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो.
राज्यानुसार उत्तर प्रदेश आघाडीवर
वार्षिक पगाराच्या राज्यानुसार आकडेवारीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत आहे. पुरुषांचा सरासरी पगार 19,53,055 रुपये तर महिलांचा सरासरी पगार 15,16,296 रुपये आहे. मॅनेजमेंट आणि कमर्शियल इंडस्ट्रीजमध्ये भारतात सर्वाधिक पगार मिळतो. या क्षेत्राचा वर्षीक पगार 29.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कायदा विभाग आहे. त्यात 27 लाख रुपये पगार मिळतो.