Eknath Shinde | सोलापुरात आचारसंहिता लागू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार, शिवसेनेच्या मेळाव्याचं काय?

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार असून ज्या जिल्ह्यांत निवडणूका जाहीर झाल्या आहेत, तेथे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातील महापूजा होईल की नाही, याबाबत साशंकता होती. ती आता दूर झाली.

Eknath Shinde | सोलापुरात आचारसंहिता लागू, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार, शिवसेनेच्या मेळाव्याचं काय?
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:40 AM

सोलापूरः राज्यात नगरपालिका निवडणूक (Nagarpalika Election) जाहीर झाल्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) हस्ते होणारी महापूजा स्थगित केली जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा शासकीय दौरा असल्याने विठ्ठलाची महापूजा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडेल, अशी माहिती देण्यात आली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सपत्नीक पूजा करतील. रविवारी पहाटेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा पार पडेल. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून राज्यभरातील वारकरी विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी आसुसले होते. यंदा हे संकट दूर झाल्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरात येण्याची परवानगी देण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

राज्यात 17 जिल्ह्यांत आचारसंहिता

राज्यातील 17 जिल्ह्यांतील तब्बल 92 नगर परिषदांच्या आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार असून ज्या जिल्ह्यांत निवडणूका जाहीर झाल्या आहेत, तेथे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपुरातील महापूजा होईल की नाही, याबाबत साशंकता होती. ती आता दूर झाली.

नव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊन त्यांच्या हस्तेच विठ्ठलाची महापूजा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. फडणवीसांच्या हस्तेच पंढरपुरात पूजा होईल, अशा आशयाचे मोठ-मोठे बॅनर्सही राज्यभरात झळकले होते. मात्र सत्ता समीकरणे बदलली आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले. पंढरपुरात रविवारी पहाटे मुख्यमंत्री शिंदे सपत्नीक महापूजा करतील. 09 जुलै रोजी रात्रीच शिंदे पंढरपुरात पोहोचतील. पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी या कार्यक्रमाचा समारोप सोहळा होईल. पहाटे महापूजा झाल्यानंतर इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी11 वाजता स्वच्छता दिंडीचा समारोप होईल.

शिंदेगटाचा शिवसेना मेळावा रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजेला परवानगी देण्यात आली असली तरीही शिंदे गटाचा शिवसेना मेळावा रद्द करण्यात आला आहे. कोरोना संकटानंतर प्रथमच आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरी सजली आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपुरात आगमन होत आहे. भाविकांच्या स्वागतासाठी पंढरपूर प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा?

  • शनिवार 9जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूर कडे प्रयाण. रात्री पंढरपूर येथे रात्री 11.30 वा. आगमन व शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.
  • रविवार 10जुलै रोजी मध्यरात्री 2.30 ते पहाटे 4.30 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थिती.
  • पहाटे 5.30 वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन. पहाटे 5.45 वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
  • सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.
  • सकाळी 11.45 वा. पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपास उपस्थिती. दु. 12.30 वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.
  • दुपारी 3 वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. 4.30 वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.