Solapur Arrest Warrant : पुण्यातील ओमिषा चिट फंड कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध अटक वॉरंट जारी

चिटफंडकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी सोलापुरातील अॅडव्होकेट श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत दि इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 या कलमान्वये ओमिषा चिटफंड कंपनीविरुद्ध फौजदारी खटला न्यायालयात दाखल केला. कोर्टाने सदर फौजदारी खटल्यात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी चारही आरोपींना अनेकदा पोलिसांकडून समन्स पाठविले.

Solapur Arrest Warrant : पुण्यातील ओमिषा चिट फंड कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध अटक वॉरंट जारी
पुण्यातील ओमिषा चिट फंड कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध अटक वॉरंट जारीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 9:24 PM

सोलापूर : पुण्यातील ओमिषा चिट फंड (Omisha Chit Fund)च्या चार संचालक मंडळाविरुद्ध सोलापूर कोर्टा (Solapur Court)ने अटक वॉरन्ट (Arrest Warrant) जारी केले आहेत. सोलापूर कोर्टात सुरू असलेल्या केसच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर असल्यामुळे हे आदेश काढण्यात आलेत. न्यायाधीश एन. एम. बिराजदार यांनी ओमिषा चिटफंडचे संचालक मानसिंग घोरपडे, दत्तात्रय टकले, कैलास परब आणि विकास नेनेकर या चार संचालक मंडळाविरुद्ध अटक वॉरंट (नॉन बेलेबल वॉरंट)चे आदेश दिले आहेत. एन. प्रभाकर या वृध्द गुंतवणूकदाराची 9 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने हे वॉरंट काढण्यात आलेय.

ओमिषा चिट फंड कंपनी मुख्य शाखा पुणे ही इन्वेस्टमेंट व फायनान्स कंपनी चालवते. या कंपनीने लोकांकडून पैसे गुंतवणूक करून घेऊन जास्त व्याजदराने रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील अनेक व्यापाऱ्यांकडून रक्कम जमा करून घेतली. त्यातील एक व्यापारी एन. प्रभाकर यांनी दरमहा बीसीच्या स्वरूपात ओमिषा चिट फंडमध्ये मोठी रक्कम गुंतवणूक केली. नंतर चिटफंडने गुंतवणूक केलेली रक्कम परतफेडीपोटी फिर्यादी एन. प्रभाकर यांना 9 लाखाचा धनादेश दिला. मात्र सदरचा चेक वटविण्यासाठी फिर्यादीने बँकेत भरला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत आला.

आरोपी सुनावणीला गैरहजर राहत असल्याने अटक वॉरंट

चिटफंडकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी सोलापुरातील अॅडव्होकेट श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत दि इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 या कलमान्वये ओमिषा चिटफंड कंपनीविरुद्ध फौजदारी खटला न्यायालयात दाखल केला. कोर्टाने सदर फौजदारी खटल्यात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी चारही आरोपींना अनेकदा पोलिसांकडून समन्स पाठविले. मात्र आरोपी कोर्टात हजर राहत नव्हते. आरोपींच्या गैरहजरमुळे कोर्टाची सुनावणी लांबत चालली होती. शेवटी फिर्यादीच्या वकिलामार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 70 अन्वये नॉन बेलेबल वॉरंट विना जामीन अटक वॉरंटसाठी याचिका दाखल करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान वारंवार समन्स पाठवूनही आरोपी कोर्टात हजर राहत नाही. त्यामुळे कोर्टाची सुनावणीस विलंब होत आहे, कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर न्यायाधीश एन. एम. बिराजदार यांनी ओमिषा चिटफंड संचालकांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला. आरोपींना अटक करून न्यायालयात पुढील तारखेपर्यंत सादर करण्याचा आदेश संबंधित पोलिस स्टेशनला देण्यात आले आहेत. फिर्यादीतर्फे एस के लॉ असोसिएटसचे अॅड. श्रीनिवास कटकुर, अँड. किरण कटकुर आणि अॅडव्होकेट आनंद सागर यांनी काम पाहिले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.