Solapur Crime : सोलापूरमधील मोहोळमध्ये महिला सरपंचाला मारहाणीचा प्रयत्न; उपसरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Feb 07, 2022 | 10:16 PM

दरम्यान उपसरपंच कोकाटे यांनी सरपंच माने यांचे आरोप फेटाळले आहेत. आपण सरपंचांना कोणतीही शिवीगाळ केली नाही. सरपंचांचा शौचालय घोटाळा बाहेर निघेल या भीतीने सरपंचांनी हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Solapur Crime : सोलापूरमधील मोहोळमध्ये महिला सरपंचाला मारहाणीचा प्रयत्न; उपसरपंचासह 9 जणांवर गुन्हा दाखल
Follow us on

सोलापूर : ग्रामपंचायतीतील अतिक्रमण काढण्यावरुन महिला सरपंचा(Lady Sarpnach)ला शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील तांबोळे गावात घडली आहे. याप्रकरणी उपसरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षासह 9 जणांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्या(Mohol Police Station)त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा माने असे पीडित महिला सरपंचाचे नाव आहे. तर रामदास कोकाटे असे शिवीगाळ करणाऱ्या उपसरपंचाचे नाव आहे. तांबोळे ग्रामपंचायतीतील अतिक्रमण काढण्यासाठी शोभा माने यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत अतिक्रमणाचा काढण्याचा विषय काढताच उपसरपंच चिडले आणि माने यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत अंगावर धावून गेले. (Attempt to beat a woman sarpanch in Mohol in Solapur, Charges filed against 9 persons)

दरम्यान उपसरपंच कोकाटे यांनी सरपंच माने यांचे आरोप फेटाळले आहेत. आपण सरपंचांना कोणतीही शिवीगाळ केली नाही. सरपंचांचा शौचालय घोटाळा बाहेर निघेल या भीतीने सरपंचांनी हा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कल्याणमध्ये जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला मारहाण

जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण ग्रामीणमधील दहिसर मोकाशी पाडा येथे शुक्रवारी घडली आहे. मारहाणीत पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून महिलांसोबतही धक्काबुक्की करण्यात आली. शिवसेनेचे माजी मातब्बर नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केलाचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मनसे आमदार राजू पाटील यांनी लावून धरली होती.

औरंगाबादमध्येही शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

शेतीच्या वादातून दोन गटात लाठ्या काठ्यानी तुंबळ मारहाण झाल्याची घटना शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथे घडली. याप्रकरणी शिवूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगड, लाठ्या काठ्या आणि बुक्यांनी मारहाण एकमेकांना मारहाण करण्यात आली. हाणामारीत जखमी झालेल्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Attempt to beat a woman sarpanch in Mohol in Solapur, Charges filed against 9 persons)

इतर बातम्या

बाळाला दूध पाजत असतानाच भरधाव कारने चिरडलं, मुंबईत कुठे घडलं पुन्हा हिट एन्ड रन?

Supreme Court : ‘कोविन’वरील नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती