Solapur Scam : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेत मोठा अपहार, बँकेतील चौघांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

| Updated on: Mar 05, 2022 | 6:41 PM

बँकेतील ग्राहकांच्या खात्यातूनच बँकेतील अधिकाऱ्यांनी परस्पर पैसै काढून अपहार केल्याच्या गैरप्रकारामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या शाखेतील इतरही खात्यांचे लेखापरीक्षण सुरु असून त्यानुसार अपहाराच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Solapur Scam : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळनेर शाखेत मोठा अपहार, बँकेतील चौघांवर कुर्डूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतला
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : गोरगरिबांची बॅक अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँके (Solapur District Central Bank)च्या माढा तालुक्यातील पिंपळनेरच्या शाखेत येथील 55 ग्राहकांच्या खात्यातून त्यांच्या परस्पर 78 लाख 19 हजार 529 रुपये काढून बँकेची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी शाखाधिकाऱ्यासह चौघांवर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे खातेदारांच्या खोट्या सह्या व अंगठे करुन त्यांचे नावे पैसै काढल्याची खोटी वाऊचर तयार केली आहेत. खोटी व बनावट दस्तऐवज तयार करुन ठकबाजी करुन 55 खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढल्या आहेत. तसेच मुदत ठेव पावत्या देखील बोगस तयार केल्याचे समोर आले आहे. (Big financial scam in Pimpalner branch of Solapur District Central Bank)

अधिकाऱ्यांनी परस्पर पैसै काढून अपहार केला

बँकेतील ग्राहकांच्या खात्यातूनच बँकेतील अधिकाऱ्यांनी परस्पर पैसै काढून अपहार केल्याच्या गैरप्रकारामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या शाखेतील इतरही खात्यांचे लेखापरीक्षण सुरु असून त्यानुसार अपहाराच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेचे सीनियर इन्स्पेक्टर व्यंकटराव मदनराव पाटील यांनी शुक्रवारी रात्री कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली असून अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शाखाधिकारी नवनाथ दगडे, क्लार्क चतुर्दास बैरागी, बँक इन्स्पेक्टर अनिल बाबर, क्लार्क दत्तात्रय वरपे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी तानाजी सरकाळे हे या शाखेत पासबुक घेऊन पैसे काढण्याकरीता आले असता त्यांच्या पासबुकावरील रक्कम बँकेतील संगणकावर दिसून येत नव्हती.

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु

याबाबत तक्रार आल्यानंतर बॅकेच्या अधिकाऱ्यांनी देखील तक्रारीचे दखल घेऊन जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कौथमिरे यांनी शाखेस भेट देऊन दप्तराची तपासणी केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु झालीय. बँकेतील शाखाधिकारी, बँक इन्स्पेक्टर व क्लार्क यांनी संगनमताने बऱ्याच खात्यातून रकमा काढून स्वतःच्या फायद्याकरीता वापरल्या. याशिवाय मयत व्यक्तींच्या खात्यातील, मुदतठेव पावत्या, शेती कर्जातील रकमा, स्वतः परस्पर काढून इतर नातेवाईकांच्या व माहितीतील व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करुन त्या व्यक्तींच्या खात्यातील या रक्कमा स्वतः परस्पर काढून घेतल्याचे दिसत आहे. या रक्कमा काढण्याबाबत संबंधित खातेदारांनी चतुर्दास बैरागी यांना कोणतेही अधिकार पत्र व संमती दिलेली नाही. याप्रकाराबाबत फिर्यादींनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असता बँकेने या प्रकरणाचा फॉरेन्सीक ऑडिट करण्याकरीता अमित लंगोटे (सीए) यांना नेमण्यात आले होते. या तपासणीत तथ्य आढळल्याने फिर्यादी व्यंकटराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना अद्याप अटक केलेली नसून आज अटकेची प्रकिया सुरु होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. (Big financial scam in Pimpalner branch of Solapur District Central Bank)

इतर बातम्या

Pune Crime | देवेंद्र फडणविसांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्लानी फोन टॅपिंग केल्याचा वकिलांचा आरोप

Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रकने दोन बालकांसह तिघांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक