महसूल मंत्र्याने धरले काँग्रेस नेत्याचे पाय; ते चित्र बघून लोकं झाली अचंबित…

आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते एका वेगळ्याच कारणामुळे. कारण भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर काही महिन्यांनी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले होते.

महसूल मंत्र्याने धरले काँग्रेस नेत्याचे पाय; ते चित्र बघून लोकं झाली अचंबित...
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 10:39 PM

सोलापूर : राज्यासह देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक नेत्यांनी आपापल्य पक्षांना सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये अनेक जण सामील झाले. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांनीही भाजपचे कमळ हाती घेऊन आमदार, खासदार तर काही जण मंत्रीही झाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एक आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला दीर्घकाळ काँग्रेसमध्ये घालवला आहे. काँग्रेसच्या काळात त्यांनी मंत्री पदही देण्यात आले होते. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्याकडून अनेकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसर जोरदार हल्लाबोल केला जातो.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याआधी ते काँग्रेसचे कट्टर नेते समजले जात होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र त्यांच्याकडून अनेकदा काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्यापासून ते अगदी बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी टीका टिप्पणी केली होती. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहणारे नेते असल्याचेही बोलले जाते.

आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते एका वेगळ्याच कारणामुळे. कारण भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर काही महिन्यांनी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले होते.

त्यानंतर त्यांच्याकडून आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्याकडून सातत्याने काँग्रेसवर टीका केली जाते. तर आज मात्र एका वेगळ्याच प्रसंगाला राधाकृष्ण विखे पाटील यांना तोंड द्यावे लागले आहे.

सोलापुरात कमलाबाई पटेल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी हे दोन्हीही नेते समोरासमोर येताच राधाकृष्ण विखे पाटल यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पाय धरले.

सोलापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श करत आशिर्वाद घेतले.

या प्रसंगानंतर मात्र या नेत्यांच्या भेटीच्या जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या होत्या. सोलापूर शहराजवळ असलेल्या कुंभारी येथील नर्सिंग इन्स्टीट्यूटचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रम ठिकाणी पोहोचताच सुशीलकुमार शिंदे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी आदराने विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श केले आणि आशिर्वाद घेतले. हे चित्र पाहून उपस्थित मान्यवर अचंबित झाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.