‘प्रणितीताई सुसंस्कृत, भाजपात आले तर…’, सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतरल चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर देण्यात आली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली.

'प्रणितीताई सुसंस्कृत, भाजपात आले तर...', सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतरल चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 6:46 PM

सोलापूर | 17 जानेवारी 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज एक मोठं वक्तव्य केलं. भाजपच्या एका बड्या नेत्याकडून आपल्याला पक्षप्रवेशाची मोठी ऑफर आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर आज संध्याकाळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट घडून आली. नाट्यसंमेलमाचं निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. पण राजकीय वर्तुळात या भेटीचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “सुशीलकुमार शिंदे हे स्वत: एक चांगले कलाकार आहेत. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अनेक नाटकांमध्ये भाग घेतला आहे. सुशीलकुमार हे 88 व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे आम्ही त्यांना नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी आलो होतो की, तुम्ही 27 तारखेला उद्घाटनाला या. या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

“सुशीलकुमार शिंदे यांना अधिकृतपणे 2019 मध्ये आणि आताही भाजपात येण्याची ऑफर दिलेली नाही. शेवटी नात्यांच्या आधारे, हाय सुशीलजी, येणार की नाही? असं कुणीतरी म्हटलं असेल. आमचे नितीन गडकरी सारखे नेते त्यांचे मित्र आहेत. आताही त्यांनी त्यांच्या आठवणी काढल्या. अशा मित्रांपैकी कुणी म्हटलं असेल, पण याला राजकीय भेट किंवा राजकीय ऑफर म्हणता येणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘राजकीय भेट झालेली ही तुम्हाला वर्षानुवर्षे कळत नाही’

“राजकीय भेट झालेली ही तुम्हाला वर्षानुवर्षे कळत नाही इतकी ती गुप्त असते. मी इतक्या जाहीरपणे आलो, सर्व नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी सोबत घेऊन आलो. नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमांचं निमंत्रण घेऊनच मी आलो. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल, माहिती नाही होईल किंवा नाही, पण तेव्हा तुम्हाला कळणारही नाही”, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

‘प्रणितीताई सुसंस्कृत, भाजपात आले तर…’

“आमच्या आज प्रदेशाध्यक्षांसह काही नेत्यांनी म्हटलं, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे काही कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय सुसंस्कृत म्हणून प्रसिद्ध आहेत, ज्यांच्यावर कधीच कुणी शितोडे उडवले नाही, त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून प्रणिती ताई चालत आहेत. प्रणिती शिंदे या आक्रमक आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आक्रमक आहेत. अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा सुसंस्कृत प्रणितीताई भाजप पक्षात आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करु. पण अशी कुठलीही ऑफर भाजपने दिली नाही किंवा तशी कुठलीही इच्छा त्यांनी व्यक्त केलेली नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.