तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची, यांना छत्रपती संभाजी राजे यांनी दिली उमेदवारीची ऑफर

यावेळी त्यांनी एका नेत्याला स्वराज्य पक्षात येण्याची ऑफर दिली. तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची, असा विश्वासही त्यांना दिला.

तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची, यांना छत्रपती संभाजी राजे यांनी दिली उमेदवारीची ऑफर
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 6:57 PM

पंढरपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीला लोकं कंटाळले आहेत. तुम्ही काय करता यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजेत. शैक्षणिक धोरण सुधारलं पाहिजे. मात्र सगळे पुढारी वेगवेगळे बोलत आहेत. असं म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांवर छत्रपती संभाजी राजे यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी एका नेत्याला स्वराज्य पक्षात येण्याची ऑफर दिली. तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची, असा विश्वासही त्यांना दिला. त्यामुळे ते खरचं स्वराज्य पक्षात येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वराज्य पक्ष स्थापन केल्यापासून छत्रपती संभाजी राजे कामाला लागले आहेत. निवडणुका लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे चांगल्या उमेदवारांच्या शोधात ते आहेत.

कुठंही फिरत बसू नका

कुठंही फिरत बसू नका तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची. अभिजित पाटील यांना छत्रपती संभाजी राजे यांनी थेट स्वराज्य पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या गाडीत बसण्यामुळे चर्चेत आले होते. तसेच इन्कम टॅक्सच्या रेडमुळेही त्यांच्या नावाची चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा

स्वराज्य पक्षात येण्याची ऑफर

भारतातील पहिला साखर कारखान्यामधील ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यामुळे अभिजित पाटली हे चर्चेत आहेत. आज त्यांना संभाजी राजे यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली. यावेळी बबनदादा शिंदे यांनाही मार्गदर्शन करण्याचे आवाहन संभाजी राजे यांनी केलं.

तानाजी सावंत यांचा फोन

ग्रामीण आरोग्य केंद्र सुसज्ज हवे आहेत. मात्र तसे दिसत नाही. धाराशिव आरोग्य केंद्राबाबत ट्विट केल्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी फोन केला. धाराशिवसोबत महाराष्ट्रातील आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा करतो, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.

केंद्र सरकारवर टीका

मोदी सरकारच्या चुकांमुळे पुलवामा झाला असल्याची घणाघाती टीका यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी केली. माजी राज्यपालांच्या आरोपांवर मला याबाबत माहीत नाही. मी ऐकल्याशिवाय त्यावर स्टेटमेंट देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी दिली.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....