Praniti Shinde | सोलापूर लोकसभेचं तिकीट प्रणिती शिंदे यांना मिळवण्यासाठी वडिलांचा खटाटोप, पडद्यामागे काय घडतंय?

देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघात उमेदवार चाचपले जात आहेत. असं असताना सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

Praniti Shinde | सोलापूर लोकसभेचं तिकीट प्रणिती शिंदे यांना मिळवण्यासाठी वडिलांचा खटाटोप, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 9:04 PM

सोलापूर | 19 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर लगेच राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी तर देशभरातील विरोधक एकवटताना दिसत आहेत. देशातील काही प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झालीय. या आघाडीचं नाव इंडिया आघाडी असं नाव ठेवण्यात आलं आहे. या इंडिया आघाडीचा लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. असं असताना सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंनी, मुलगी प्रणिती शिंदेंसाठी लॉबिंग सुरु केलीय. सोलापुरातून मुलगी प्रणिती शिंदेंना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्यासाठी सुशील कुमार शिंदेंनी कंबर कसलीय. प्रणिती, योग्य उमेदवार आहेत. तिकीट देण्यासाठी हायकमांडशी बोलणार, असं सुशील कुमार शिंदे म्हणाले आहेत. सुशीलकुमार शिंदे हे एकेकाळी केंद्रीय गृहमंत्री होते. विशेष म्हणजे गृहमंत्री असताना त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर लोकसभेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

सुशीलकुमार शिंदे यांचा दोनवेळा पराभव

सोलापूर लोकसभा मतदारसंघ आघाडीतही काँग्रेसकडेच होता. सुशील कुमार शिंदे 2014 मध्ये केंद्रीय गृहमंत्री असताना पराभूत झाले होते. भाजपच्या शरद बनसोडेंनी 1 लाख 49 हजार मतांनी शिंदेंचा पराभव केला होता. 2019 मध्येही सुशील शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या जयसिद्धेश्वर महाराजांनी शिंदेना 1 लाख 58 हजार मतांनी पराभूत केलं.

आता मुलगी, आमदार प्रणितीसाठी वडील सुशील कुमार शिंदेंनी लॉबिंग सुरु केलीय. याआधीही प्रणिती शिंदेंनाही लोकसभा लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारलाय. त्यावेळी त्यांनी सकारात्कताच दाखवलीय. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.

दुसरीकडे सोलापुरातून कोणीही उभं राहिलं तरी विजय भाजपचाच होईल असं भाजपनं म्हटलंय. सुशील कुमार शिंदे ज्या पद्धतीनं बोलतायत, त्यावर एक स्पष्ट दिसंतय की, सलगच्या 2 पराभवानंतर ते पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभा लढवण्याच्या मूडमध्ये नाहीत. मात्र मुलीनं खासदार व्हावं यासाठी ते काटोकाट प्रयत्न करताना दिसतायत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.