काँग्रेसमधील वाद उफाळलेला असताना यशोमती ठाकूर म्हणतात, ‘नाना पटोले डॅशिंग लीडर’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे डॅशिंग लीडर आहेत, असं मत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मांडलंय. त्यांनी नाना पटोले यांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक केलंय.

काँग्रेसमधील वाद उफाळलेला असताना यशोमती ठाकूर म्हणतात, 'नाना पटोले डॅशिंग लीडर'
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 4:51 PM

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे डॅशिंग लीडर आहेत, असं मत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी मांडलंय. त्यांनी नाना पटोले यांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक केलंय. त्यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत कलहावर भाष्य केलं. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत कलहाची चांगलीच चर्चा सुरुय. काँग्रेस पक्षातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं स्पष्टपणे समोर आलंय. अशा परिस्थितीत यशोमती ठाकूर यांचं आलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत कलहावरही भाष्य केलंय.

नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन हा वाद सुरु झाला. आमदार सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली.

विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर हा अंतर्गत कलह जास्त ठळकपणे उघड झाला. कारण सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून नाना पटोले यांच्यासोबत काम करणं कठीण झाल्याचं म्हटलं. त्यांच्या आरोपांना पटोले यांनीदेखील उत्तर दिलं. पण नाना पटोले यांनी हा वाद वाढवू नका, असंच आवाहन केलं.

या सगळ्या घडामोडींदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार पाच वर्ष टिकलं असतं, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. नाना पटोले हे डॅशिंग लीडर आहेत, असंदेखील त्या म्हणाल्या. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस लवकरच मिटेल, असा दावा त्यांनी केला.

यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

“धुसफूस काही फक्त काँग्रेसमध्येच आहे, असं नाही. ती भाजपमध्येही तितकीच आहे”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

“नाना पटोले हे करारी आहेत. ते तडकाफडकी निर्णय घेतात. त्यांच्यामध्ये डेअरिंग आहे. म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणून दु:ख झालं होतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“खासदार संजय राऊत जे म्हणत आहेत त्यावर मी सुद्धा सहभागी आहे. नाना पटोले विधानसभेचे सभापती राहिले असते तर महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असता”, अशी भूमिका यशोमती ठाकूर यांनी मांडली.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.