“‘त्या’ घटनेचं खापर भाजपनं आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर फोडलं”; काँग्रेसकडून भाजपवर पॉलिटिकल इव्हेंटचं गंभीर आरोप

श्री सेवकांना बळजबरीने घेऊन जाण्यात आले होते. यासाठी भाजपने त्या ठिकाणी धार्मिक राजकारण केले आहे. राज्य सरकारकडून श्री सेवाकांची काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे भर कार्यक्रमामध्ये उष्माघाताचे बळी गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केलाआहे.

'त्या' घटनेचं खापर भाजपनं आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर फोडलं; काँग्रेसकडून भाजपवर पॉलिटिकल इव्हेंटचं गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 5:55 PM

सोलापूर : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमामध्ये उष्माघाताचा त्रास होऊन 13 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर त्या कार्यक्रमावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. ही घटना घडल्यापासून काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका करत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. प्रणिती शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमावर टीका करताना भाजप शिंदे सरकारकडून पॉलिटिकल इव्हेंट करण्यासाठी श्री सेवकांचा वापर केला आहे का..? असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमामध्ये उष्माघाताने मृत्यू झालेल्या नागरिकांवरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या कार्यक्रमावरून टीका करताना म्हणाले की, 16 एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमावेळी ऑन रेकॉर्ड 13 जणांचा बळी झालेला मात्र ऑफ द रेकॉर्ड आकडा वेगळा आहे असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून या घटनेचे खापर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर फोडले जात आहे. मात्र ही गंभीर गोष्ट आहे. ज्या व्यक्तीली पुरस्राकर प्रदान केला जातो, त्याच माणसावर जर सरकारकडून अशा कार्यक्रमाचे खापर फोडले जात असेल तर ते दुर्देवी आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका करताना म्हणाल्या की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच दुपारी कार्यक्रम घेतल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. ज्या कार्यक्रमामध्ये माणसांचे बळी गेले आहेत.

त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचे खापर त्यांच्यावर फोडले जात आहे मात्र महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला नागरी सुविधा नव्हत्या, तर व्हीआयपी व्यक्तीना मात्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळेच मृत्यू झाला आहे का याची आधी चौकशी केली पाहिजे. कार्यक्रमाबाबत अनेक शंकाही उपस्थित केल्या आहेत. तर कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना पाच लाख रुपये तुटपुंजी मदत देण्यात आली आहे.

मात्र ही मदत देऊन फक्त उपयोगाचे नाही तर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.या घटनेमुळे दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याची मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे. उष्माघातामुळे असे मृत्यू कधीच झाले नाहीत. या मागचे कारण कळले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

श्री सेवकांना बळजबरीने घेऊन जाण्यात आले होते. यासाठी भाजपने त्या ठिकाणी धार्मिक राजकारण केले आहे. राज्य सरकारकडून श्री सेवाकांची काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे भर कार्यक्रमामध्ये उष्माघाताचे बळी गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केलाआहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.