Gautami Patil | गौतमी पाटील हिला सर्वात मोठी ऑफर, आता थेट परदेशात कार्यक्रमासाठी जाणार?

गौतमी पाटील हे नाव आता परदेशात देखील गाजायला लागलं आहे. त्यामुळे तिला आता थेट विदेशातून कार्यक्रमासाठी ऑफर आल्याची माहिती समोर आली आहे. गौतमी पाटील हिने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Gautami Patil | गौतमी पाटील हिला सर्वात मोठी ऑफर, आता थेट परदेशात कार्यक्रमासाठी जाणार?
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 11:24 PM

सोलापूर |  2 ऑगस्ट 2023 : आपल्या स्वप्नांवर आपला विश्वास असेल तर आपण आपलं स्वप्न पूर्ण करु शकतो. विशेष म्हणजे आपल्या कलेवर आपलं निस्सिम प्रेम असणं जास्त आवश्यक आहे. कलेची साधन सतत करायला हवी. सराव करायला हवा आणि अतिशय विनम्रपणे आयुष्यातील आव्हानांना सामोरं जायला हवं. कारण आपला वाईट काळ किंवा बॅड पॅच जरी सुरु असला तरी तो मर्यादित कालावधीसाठी असतो. या कालावधीचा आपण सामना कसा करतो हे महत्त्वाचं असतं. कारण त्यावर आपलं भवितव्य अवलंबून असलं पाहिजे. याउलट आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहिलं पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या आयुष्यातही त्याचे सकारात्मक बदल जाणवू लागतात. डान्सर गौतमी पाटील हिच्याबाबत याच गोष्टी घडताना दिसत आहेत.

गौतमी पाटील हिचा भूतकाळ आपल्या सर्वांना माहिती आहे. ती लाईमलाईटमध्ये कशी आली ते आपल्या सर्वांना माहिती आहे. ती सुरुवातीला तिच्या अश्लिल हावभावांमुळे टीकेची धनी ठरली. तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. पण नंतर ती बदलली. या दरम्यान गौतमी पाटील हिचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले. पण गौतमीच्या समर्थकांचा गट नेहमीत दुसऱ्या गटावर अव्वल ठरला.

दरम्यानच्या काळात गौतमीचा अश्लिल व्हिडीओ बनवून काही समाजकंटकांनी तिला आतून खचवण्याचा प्रयत्न केला. पण गौतमीला तिच्या चाहत्यांनी पुन्हा काम करण्याची प्रेरणा दिली. त्यातून गौतमीने उभारी घेतली आणि तिने पुन्हा माघारी न फिरण्याचा निर्धार केला. तिची उत्तुंग भरारी सुरुच आहे. सध्याच्या घडीला सेलिब्रिटिंना गौतमीचा नंबर मिळणं कठीण होऊन बसलं आहे.

गौतमीला विदेशातून कार्यक्रमाची ऑफर

गौतमीच्या कार्यक्रमात कधीतरी हुल्लडबाजांच्या गोंधळाच्या बातम्या समोर येतात. यामुळे तिने तिच्या चाहत्यांनाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. असं असताना गौतमीने आज सोलापूरचा कार्यक्रम संपल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला महत्त्वाची माहिती दिली. गौतमीला कार्यक्रमासाठी आता थेट विदेशातून विचारणा केली जात असल्याची माहिती तिने दिली. “राज्याबाहेरून आणि परदेशातून मला शोसाठी विचारणा झाली आहे. मात्र बाहेर जाऊन शो करण्याबाबत मी आत्ताच कोणताही निर्णय घेतलेला नाही. मला वाटलं तर मी नक्की करेल आणि संधी आली तर पाहू”, अशी प्रतिक्रिया गौतमीने आज दिली.

गौतमीचं चाहत्यांना आवाहन

“मी माझ्या चाहत्यांना सांगितलेलं आहे की, ज्यांना दगडफेक करायची आहे, गोंधळ घालायचा आहे, त्यांनी कार्यक्रमाला येऊ नका. ज्यांना कार्यक्रम एन्जॉय करायचा असेल त्यांनी आवर्जून या”, असं आवाहन गौतमी पाटीलने केलं आहे. “पुरुष ज्या संख्येने असतात, तेवढ्याच संख्येने महिला वर्ग देखील कार्यक्रम पाहायला येतो”, असं गौतमी पाटील म्हणाली.

गौतमीला इस्टाग्रामवर 1 मिलीयन फॉलोवर्स

“माझे इस्टाग्रामवर एक महिन्यापूर्वी 1 मिलीयन फॉलोवर्स झालेत. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं म्हणून हे झालं आहे”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली. “सोलापुरात माझा कार्यक्रम छान झाला. कुठलेही हुल्लडबाजी, गोंधळ न होता कार्यक्रम पार पडला”, असं म्हणत गौतमीने सोलापूरच्या कार्यक्रमावर समाधान व्यक्त केलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.