मोठी बातमी! ठाकरे गटाचे शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! ठाकरे गटाचे शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी
ठाकरे गटाचे नेते शरद कोळी
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 4:32 PM

ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शरद कोळी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शरद कोळी हे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या आक्रमक भाषणामुळे राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. शरद कोळी यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे शरद कोळी यांच्या भाषणामुळे त्यांना जळगाव जिल्ह्यात भाषणास बंदी घालण्यात आली होती. शरद कोळी यांना त्यावेळी पोलिसांकडून अटक केली जाणार होती. पण ते जळगावमधून अज्ञातस्थळी रवाना झाले होते. शरद कोळी यांनी सुरुवातीला शिंदे गटाच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे ते जास्त प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे ते प्रसिद्ध झाले होते. याच शरद कोळी यांना आता जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. पण त्यांना राजकीय कारणातून ही धमकी आलेली नाही तर वेगळ्या कारणास्तव धमकी आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोलापुरातील वाळूमाफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याच्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. याविरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी भीमा नदी पात्रातील अवैध वाळू तस्करी करणारे ट्रक पकडून दिले होते. त्यामुळे कुप्रसिद्ध वाळू माफिया अण्णाराव उर्फ पिंटू पाटील याने ही धमकी दिली. त्याचबरोबर सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याचीही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी नेमकी काय धमकी दिली?

मिळालेल्या माहितीनुसार, शरद कोळी यांचा गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात एल्गार सुरु आहे. शरद कोळी यांनी मध्यंतरी नदीत वाळू माफिया करणारे ट्रक देखील पकडून दिले. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. या वाळू माफियांनी आता शरद कोळी यांचा बदला घेण्याच्या इराद्यातून त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शरद कोळी हे 6 जुलैला मित्र संतोष पाटील यांच्यासोबत शिवसेना कार्यालयात बसले होते. याच वेळी अक्कलकोट तालुक्यातील संबंधित वाळू माफियाचा संतोष पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला.

“मागील वेळी शरद कोळींच्या अंगावर लोकांना सोडून गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला होता, त्यात सुदैवाने ते वाचले. मात्र यावेळी वाचणार नाही, जिथे दिसेल तिथे गोळ्या घालू. तसेच सोलापूर शहरातील त्यांचे कार्यालय जाळून टाकू”, अशी धमकी वाळू माफियाने फोनवर दिली. यानंतर शरद कोळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.