शेतकरी आक्रमक..! देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला, ताफा अडविणार म्हणजे अडविणारच…

नाशिकच्या लाँग मार्चला दिलेले आश्वासन अशा या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शेतकरी आक्रमक..! देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला, ताफा अडविणार म्हणजे अडविणारच...
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 5:23 PM

सोलापूर : राज्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच शेतमालाला ना योग्य बाजारभाव मिळतो, ना शेतीपिकासाठी योग्य निसर्गाची साथ मिळते त्यामुळे राज्यातील बळीराजा संकटांचा सामना करत आहे. त्यातच सरकारकडून फक्त अश्वासनांची खैरात होते, प्रत्यक्षात मात्र ना मदत मिळते ना सरकार शेतकऱ्यांच्या कामी येते. यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना इशारा देत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

त्यामुळे उद्याचा दिवशी राजकीय वातावरण आणखी तंग असणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दिलेली अश्वासनं भाजपकडून पूर्ण झाली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी राग व्यक्त करत आता ताफा अडविणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय किसान सभेने इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातही गतवर्षी झालेल्या खरीप, रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नाही.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही थकीत 385 कोटी रुपये शेतकर्‍यांना कारखानदारांकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ते बिल शेतकऱ्यांनी तात्काळ मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नाशिकच्या लाँग मार्चला दिलेले आश्वासन अशा या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला असून शेतकऱ्यांना दिलेली अश्वासनं पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ होणार असल्याने त्यांच्या या दौऱ्यानिमित्त शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. याबाबतचे शेतकऱ्यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.