Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठी धुसफूस, दोन बडे नेते आमनेसामने, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षातील दोन मोठे नेते एकमेकांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे करत आहेत. त्यामुळे या वादावर आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठी धुसफूस, दोन बडे नेते आमनेसामने, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 7:03 PM

सागर सुरवसे, Tv9 मराठी, सोलापूर | 20 ऑक्टोबर 2023 : शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. शिवसेना दोन गटात विभागली गेलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी कोर्टात लढाई सुरु ठेवली आहे. दोन्ही गटांकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरु आहे. असं असताना आता सोलापुरात शिंदे गटातील मोठी धुसफूस समोर आली आहे. विशेष म्हणजे देशात आगामी लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकांनंतर देशात लगेच विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत. असं असताना सोलापुरात शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत आणि जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांच्यातील वाद उफाळून बाहेर आलाय.

शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांची तक्रार केली आहे. तसेच शिवाजी सावंत यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारं पत्र चवरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. दुसरीकडे मात्र सोलापूर जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

पंढरपूर विभागाच्या शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हा अध्यक्षपदावरून मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्यातूनच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वादाचा फटका शिंदे गटाला बसण्याची दाट शक्यता आहे. सोलापूर येथे झालेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भांडणं, त्याचबरोबर संपर्क प्रमुखपदी असताना मर्जीतील कार्यकर्त्यांना तसेच शिवाजी सावंत गटाचे ऐकणार त्याला पद आणि सावंत गटाचं ऐकणार नाही त्यांना पद नाही, अशी भूमिका सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचा दावा चरणराज चवरे यांनी केलाय.

चरणराज चवरे यांची नेमकी भूमिका काय?

पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख चरणराज चवर यांनी आपले कार्यक्षेत्र असलेल्या कोणत्याही तालुक्यात जाऊन आपली जबाबदारी पार पडण्याचे काम केले नाही. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पदाचा वापर केला, असा ठपका ठेवून हकालपट्टीसाठी सावंत बंधूंकडून षडयंत्र रचले जात असल्याचा दावा चरणराज चवरे यांनी केलाय.

स्वतः पक्षाचे संपर्क प्रमुख असताना सर्वांशी संपर्क ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जो सावंत गटाचे नाव मोठे न करता शिंदे गटाचे नाव मोठे करतो अशांना पक्षातून बाजूला काढण्याचे काम सावंत बंधू करत असल्याचा आरोप चवरे यांनी केलाय. तर संपर्कप्रमुख हा सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ घालणारा असावा. भांडणे लावणारा नसावा. त्याचबरोबर सावंत बंधू यांना संपर्क प्रमुख हे पद न झेपणांर आहे, असा आरोपही पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी केला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.