शिंदे गटाने निवडणूक आयोगाला 100 ते 200 कोटी रुपये देऊन मॅनेज केले का?; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
धनुष्यबाणाविषयी जर शिंदे गटाच्या आमदारांकडून ज्या प्रमाणे दावा केला जात आहे. ज्याप्रमाणे संतोष बांगर सांगत आहेत त्या प्रमाणे तसे झाले तर मात्र देशातील जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सोलापूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाविषयीही त्यानंतर प्रचंड वाद सुरू झाला. धनुष्यबाण या चिन्हासाठी न्यायालयात हा वाद गेल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटानेही त्यावर दावा केला.
न्यायालयाकडून सोमवारी धनुष्यबाणाविषयीचा निर्णय 20 जानेवारी रोजी देण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच शिंदे गटाकडून हे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला जात आहे.
तर शिंदे गटाचेच आमदार संतोष बांगर यांनी धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार असे आत्मविश्वासाने सांगितले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना त्यावरून जोरदार टोला लगावला आहे.
शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण या चिन्हाचा वाद हा न्यायालयामध्ये आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हा वाद असतानाही आमदार संतोष बांगर यांच्याकडून कोणत्या गोष्टीवर ते ठामपणे सांगत आहेत असा सवाल करुन त्यांनी न्यायालयाविषयी गंभीर आरोप केले आहेत.
त्यामुळेच ते म्हणत आहेत की, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला आज मिळणार असं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर एवढ्या आत्मविश्वासाने कसे काय म्हणतायत?
ज्या प्रकारे ते अतिआत्मविश्वासाने धनुष्यबाणावर दावा केला आहे त्यावरून असे दिसत आहे की, शिंदे गटाने निवडणूक आयोगाला 100 ते 200 कोटी रुपये देऊन मॅनेज केल्याप्रमाणेच ते बोलत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
शिंदे गटाचे आमदार ज्या प्रमाणे धनुष्यबाण चिन्हाचा वाद न्यायालयात असतानाही त्यावर पूर्ण दावा केला जात आहे. धनुष्यबाणाबाबत वाद आणि दावा केला जात असला तरी न्यायालय आता कोणता निर्णय देणार याकडे दोन्ही गटासह साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तरीही शिंदे गटाकडून मात्र धनुष्यबाणावर ठामपणाने विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे काहीतरी गौडबंगाल आहे असा संशय शरद कोळी यांनी व्यक्त केला आहे.
धनुष्यबाणाविषयी जर शिंदे गटाच्या आमदारांकडून ज्या प्रमाणे दावा केला जात आहे. ज्याप्रमाणे संतोष बांगर सांगत आहेत त्या प्रमाणे तसे झाले तर मात्र देशातील जनतेचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तर शरद कोळी यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत संजय बांगर हे निवडणूक आयोग खरेदी केल्याप्रमाणे बाता मारत आहेत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.