राजकारणात कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा… भाजप खासदाराचा नेमका सल्ला काय ?
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आले. मुंबईवरून सोलापूर या ट्रेनमध्ये तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचे थांबे देण्यात आले आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या शहरांतील आधात्मिक ठिकाणांना जोडेल. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेणे, नाशिकचे रामकुंड, […]
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात आले. मुंबईवरून सोलापूर या ट्रेनमध्ये तुळजापूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचे थांबे देण्यात आले आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या शहरांतील आधात्मिक ठिकाणांना जोडेल. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेणे, नाशिकचे रामकुंड, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आई तुळजाभवानी यांचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे. एकेकाळी खासदार आमच्या क्षेत्रात स्टेशनवर ट्रेन थांबवण्यासाठी पत्र लिहून विनंती करत होते. आता, खासदार आमच्याकडेही वंदे भारत ट्रेन पाठवा, अशी विनंती करतात, असे म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या याच भाषणाचा धागा धरत सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनीही मोठे विधान केले आहे. सोलापूरसाठी आज ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू झाली याचा मनस्वी आनंद आहे. 2019 पासून या रेल्वेगाडीसाठी मी लोकसभेमध्ये प्रयत्न करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या शब्द पाळत सोलापूरसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दिली आहे. या ट्रेनमुळे सोलापूरकरांचा प्रवास सुखकर होणार आहे, असे खासदार म्हणाले.
वंदे भारत ट्रेनमुळे सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या धार्मिक पर्यटन असलेल्या भागाचा विकास झपाट्याने होणार आहे. अध्यात्म सांगते की, कर्म करा फळाची अपेक्षा करू नका. मात्र, राजकारणात तसेच लोकांच्या विकासासाठी कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा ही ठेवावीच लागते. फळ नाही मिळाले तर उपयोग नाही. निवडून आल्यानंतर 2019 पासून पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरते यामुळे खूप आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील आधुनिक कनेक्टिव्हिटिच्या दृष्टीने वंदे भारत एक्सप्रेस खुप उपयुक्त आहे. या एक्सप्रेसमुळे भारताची सांस्कृतिक, आर्थिक प्रगती होणार आहे. आधुनिक भारताचे हे वेगवान प्रतिबिंब आहे. आतापर्यंत देशात 10 ट्रेन सुरु झाल्या असून 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसने जोडले गेले आहेत.