वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ: हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर झाला व्हायरल…

रेल्वेत घडलेल्या सगळ्या प्रकारबद्दल आयआरसिटीसीला पत्र लिहणार असल्याचे सोलापूर रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आज घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशीवर्गातून भीती व्यक्त केली जात आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ: हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर झाला व्हायरल...
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:07 PM

सोलापूरः देशभर ज्या वंदे भारत एक्सप्रेसचे गवागवा करण्यात आला आहे, त्याच रेल्वेमध्ये आता धक्कादायक प्रकार घडल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.रेल्वे खात्यावर विश्वास ठेऊन अनेक जण लांब पल्ल्याचा प्रवास करत असतात. त्याच प्रमाणे आजही एक प्रवाशी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. त्यावेळी या गाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

रेल्वेतून प्रवास करत असताना चहा,जेवण, अल्पोपहाराची सोयही केली जाते. यावेळी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाने खाण्यासाठी बिस्कीट घेतलेली होती.

मात्र ती बिस्कीट घेतल्यानंतर प्रवाशाच्या लक्षात आले की, ही खाण्यासाठी घेतलेली बिस्कीटे ही कालबाह्य झालेली आहेत ही गोष्ट त्या प्रवाशाच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेकडे त्याबाबत तक्रारही केली आहे.

वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेने नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईकडे प्रवास करत होते. हा प्रवास करत असताना त्यांनी खाण्यासाठी म्हणून रेल्वेतील काही खाद्यपदार्थ विकत घेतले होते.

त्यामध्ये त्यांनी रेल्वेमध्ये मिळणारी बिस्कीट घेतली होती. सकाळच्या वेळेत सोलापूर स्थानकातून गाडी निघाली तेव्हाच काही वेळातच प्रवाशांना ही चहा आणि बिस्किटे देण्यात आली. मात्र ज्या वेळी चहासोबत दिलेली बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यानंचक मात्र त्यांना धक्काच बसला.

रेल्वेमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकारचा त्यांनी व्हिडीओ तयार केला. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे याची तक्रारही केली आहे.

त्यामुळे त्यांनी त्यांच्या हा अनुभवाचा व्हिडीओ तयार केला होता.त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमधून त्यांनी या सगळ्या प्रकाराची रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार केल्याचेही सांगितले आहे. दरम्यान या संदर्भात रेल्वे प्रशासनाची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता वंदे भारत एक्सप्रेसमध्ये खानपानाची जबाबदारी ही आयआरसिटीसीचीच असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या सगळ्या प्रकारबद्दल आम्ही आयआरसिटीसीला पत्र लिहणार असल्याचे सोलापूर रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.