“मुलांना आणि गुरांना सांभाळणं आता कठीण झालय”; शेतकऱ्यांचा बैलगाडीतून थेट वर्षावर मोर्चा…

आधी उताऱ्यावर नाव चढवले आणि नंतर नोटीस पाठवली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आमच्या सातबारा उताऱ्यावर आमचे नाव लावण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

मुलांना आणि गुरांना सांभाळणं आता कठीण झालय; शेतकऱ्यांचा बैलगाडीतून थेट वर्षावर मोर्चा...
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 5:16 PM

सोलापूर : राज्यातील कष्टकरी, शेतकरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मुद्यावरून सरकारला आता घेरले आहे. नाशिक-मुंबई असा किसान सभेने लाँग मार्च काढला आहे. तर दुसरीकडे एकच मिशन, जुनी पेन्शन म्हणत शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले आहे. तर मंद्रूप-मुंबई असा मोर्चा आता शेतकऱ्यांनी काढला असून शेतकरी बैलगाडीसह आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. तो मोर्चा आता सोलापूरात येऊन धडकला आहे. त्यामुळे मंद्रूप-मुंबई असा मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा आता वर्षावर धडकणार असल्याने आता सरकार पेचात सापडले आहे.

मंद्रूपमधील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर एमआयडीसीची नोंद असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर बैलगाडी मोर्चा काढला आहे.

सरकार आणि उद्योग मंत्र्यांनी सात बारा उताऱ्याविषयी अश्वासन देऊनही त्याबाबत कोणतीही पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे त्रस्त झलेल्या शेतकऱ्यांनी बैलगाडीसह मुंबईवर मोर्चा काढला आहे.

शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आता सोलापूर शहरात पोहचला असून या मोर्चामध्ये मंद्रूप ते मुंबई बैलगाडी मोर्चामध्ये 100 हून अधिक शेतकरी कुटुंबासह मुंबईकडे रवाना होत आहेत.

आमच्या शेतावरील 7/12 उताऱ्यावर एमआयडीसीची नोंद झालेली आहे. ती निघावी यासाठी आम्ही आमच्या लहान पोरांना घेऊन निघालो असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील चार वर्षापासून आम्हाला शेतीवर कर्ज मिळत नाही त्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न आहे निर्माण झाल्याची कैफियतही या शेतकरी मोर्चाने मांडली आहे.

सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आता आमच्यावर आर्थिक संकट आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या मुलांना सांभाळायची आम्हाला ताकत नाही.

आणि गुरे सांभाळणे आम्हाला आता मुश्किल झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 7/12 वरील एमआयडीसीचा शेरा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचेही सरकारने ठामपणे सांगितले आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे की, मागील सहा महिन्यांपासून आम्ही आंदोलन करतो आहे.मात्र सरकारकडून केवळ आश्वासनेच दिली जातात. आमदार, उद्योग मंत्री, सचिव सर्वच लोक आम्हाला सांगत आहेत की तुमच्या शेतीवर एमआयडीसी होणार नाही.

मात्र जोपर्यंत सातबारा उताऱ्यावर आमचे नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाकडून आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही आता मुंबईला वर्षा निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार.

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशा शब्दातही त्यांनी सरकारला सुनावले आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर एमआयडीसी अशी नोंद आहे. त्यामुळे त्या उताऱ्यावर बँक लोनही मिळाले नाही.

त्यामुळे यंदाच्या वर्षी उत्पादन घेता आले नाही. शेतकऱ्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे शेती मात्र तशीच पडीक राहिली आहे. त्यामुळे आम्हाला एमआयडीसीसाठी शेती द्यायचीच नाही.

आम्ही अल्पभूधारक शेतकरी असल्याने आमची शेतीवरच गुजराण असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. मुळात आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला विश्वासातच घेतले नाही.

त्यामुळे आधी उताऱ्यावर नाव चढवले आणि नंतर नोटीस पाठवली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आमच्या सातबारा उताऱ्यावर आमचे नाव लावण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.