सोलापूर : माजी महिला ग्रामपंचायत सदस्या (Grampanchayat Member)ने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना रविवारी दुपारी उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडली आहे. सविता संतोष कोरे असे मयत महिला सदस्याचे नाव आहे. गावातील विहिरीत उडी घेऊन सविता यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ माजली आहे. सविता यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांच्यावर गेल्या तीन महिन्यांपासून मानसोपचार सुरु होते. सविता दुपारी मुलगा झोपला असताना वेडाच्या भरात घरुन निघून गेल्या व गावाशेजारील सोलापूर-बार्शी रस्त्याजवळच्या देवबप्पा या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची नोंद उत्तर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (Former female Gram Panchayat member commits suicide in Solapur)
सविता यांचे पती संतोष हे हॉटेलमधून घरी जेवायला आले असता पत्नी घरात नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तिचा शेतात तसेच अन्य ठिकाणी शोध घेतला असता विहिरी वरती सविता यांच्या चप्पल दिसून आल्या. यावरून पत्नीने विहिरीत पडून आत्महत्या केल्याचा त्यांना संशय आला. गावातील नागरिक आणि युवकांच्या मदतीने पाण्यात कॅमेरा सोडून शोधाशोध सुरू केली. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने महिलेला बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होत होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विहिरीतील पाण्यात हुकाद्वारे व पाण्यात पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने विहिरीत बुडालेल्या महिलेला वर काढण्यात यश आले. तसेच पुढील उपचाराकरीता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच उत्तर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल अशोक खवतडे घटनास्थळी दाखल झाले होते. ही माहिती गावात कळताच विहिरीवर बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सविता यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे, दीर,जाऊ असा परिवार आहे. सविता यांच्यासारख्या मनमिळाऊ स्वभावाच्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. (Former female Gram Panchayat member commits suicide in Solapur)
इतर बातम्या
Hit & Run : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; हिट अँड रन प्रकरणातील बळींच्या कुटुंबियांना आठपट अधिक भरपाई