हुल्लडबाजी करणाऱ्या गौतमी पाटीलच्या चाहत्यांना काठीचा प्रसाद; पोलीस बंदोबस्तात गौतमीची गाडी

मला राजकारणाचं नॉलेज नाही. मला त्यात पडायचं नाही. गौतमी पाटील यापुढे फक्त लावणीच सादर करणार नाही तर वेस्टर्न डान्स,अॅक्टिंगपण करेल, असंही गौतमी पाटील हिने सांगितलं.

हुल्लडबाजी करणाऱ्या गौतमी पाटीलच्या चाहत्यांना काठीचा प्रसाद; पोलीस बंदोबस्तात गौतमीची गाडी
गौतमी पाटील
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 9:58 AM

संदीप शिंदे, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) माढ्यातील मोडनिंबमध्ये गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला पुरुषांसह महिलांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस बंदोबस्तासह बाऊन्सर तैनात होते. हुल्लडबाजी करणाऱ्या गौतमीच्या अनेक चाहत्यांना काठीचा प्रसाद खावा लागला. एक चाहता तर ज्युस सेंटरच्या गाड्यावर चढून कार्यक्रम पाहताना दिसला. गौतमीने शांत बसण्याचे आवाहन केले. कार्यक्रम बंद करण्याचा इशारा देऊनही प्रेषक हुल्लडबाजी करताना दिसले. कार्यक्रमाच्या एन्ट्रीच्या ठिकाणी गर्दी होती. पोलीस बंदोबस्तात गौतमीची गाडी दुसऱ्या बाजूने आली.

गौतमी पाटील हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गौतमी पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानामित्त असलेल्या कार्यक्रमाला मला बोलवल्याचा फार आनंद होतोय. मी खूप खूश आहे, असं गौतमी पाटील म्हणाली.

गौतमी पाटीलने दिला इशारा

प्रेक्षकांना आवाहन करताना गौतमी पाटील म्हणाल्या, तुम्ही शांत बसले नाही. तर हा कार्यक्रम होणार नाही. असा इशारा गौतमी पाटील हिने दिला. तरीही चाहते काही शांत बसत नव्हते. शेवटी पोलिसांना हुल्लडबाजी करणाऱ्यांवर काठीचा प्रसाद द्यावा लागला.

अजित पवार यांना भेटणार

अजित दादा खूप मोठे देवमाणूस आहेत. माझे म्हणणे मांडण्यासाठी अजितदादांना कसं भेटायचं. त्यांना भेटण्याचं सध्या तरी डोक्यात नाही.मात्र येत्या काही दिवसांत भेटणार असल्याचं गौतमी पाटील यांनी म्हंटलं.

वेस्टर्न डान्सही सादर करणार

मला राजकारणाचं नॉलेज नाही. मला त्यात पडायचं नाही. गौतमी पाटील यापुढे फक्त लावणीच सादर करणार नाही तर वेस्टर्न डान्स,अॅक्टिंगपण करेल, असंही गौतमी पाटील हिने सांगितलं.

मलाच ट्रोल का केले जाते?

यापूर्वी गौतमी पाटील हिने मी अश्लील डान्स करणं सोडून दिलं. पण, तरीही माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात. ते दाखवून मला ट्रोल केले जाते. याबद्दल खंत व्यक्त केली. मी चुकीची होती तेव्हा ती चूक सुधारली. आता चांगले कार्यक्रम सादर करते, असंही तिने सांगितलं.

गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम म्हटला की, पोलीस बंदोबस्त आलाच. पण, या बंदोबस्तालाही चाहते जुमानताना दिसत नाही. शेवटी गौतमी पाटील हिला शांततेचे आवाहन करावे लागते. तरीही हुल्लडबाजी करणारे काही मागे हटत नाही. म्हणून गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ उडतो. असाच गोंधळ माढ्यातील या कार्यक्रमात उडाला होता.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.