धक्कादायक! मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाचा हल्ला, नेमकं प्रकरण काय?

मंगळवेढ्यात पोलीस उपिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीसच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणी पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

धक्कादायक! मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाचा हल्ला, नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 3:04 PM

सोलापूर | 9 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरश: टोक गाठलं आहे. मुंबईच्या दहीसरमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर काल गोळीबाराची घटना घडली. त्याआधी चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबाराची घटना घडली होती. तसेच गेल्या आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर सातत्याने गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद तरुणांनी एका हॉटेल मालकासह स्थानिक 17 ते 18 नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात पोलीस उपनिरीक्षकावर ढाबा चालकाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील मरवढे येथील उशिरापर्यंत सुरू ठेवलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकावर ढाबा चालकासह सात ते आठ जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच संबंधित परिसरात आरोपींची दहशत किती आहे ते या प्रकरणातून समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मरवढे येथील महाराजा ढाबा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. ढाबा उशिरापर्यंत का सुरू ठेवला? बंद करा असे सांगताच,ढाबा चालकासह इतर सात ते आठ अनोळखी तरूणांनी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे आणि गाडी चालकाला मारहाण केली. आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या गाडी चालकाला लाकडी दांडके, काठ्यांनी डोक्यात आणि हाता पायावर मारून गंभीर जखमी केलं आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात ढाबा चालकासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मालकाचे नाव समीर मुजावर असे आहे. तर चालक पोलीस हवालदाराचं नाव अंसारी असं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.