Solapur Crime : सोलापूरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

तडजोडीअंती 50 हजार रुपये घेण्याचे ठरले होते. आरोपी पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी जरी पैसे स्वीकारले नसले तरी ज्यांनी लाचेची मागणी केली होती. असे तपासात निष्पन्न झाल्या कारणाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.

Solapur Crime : सोलापूरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
सोलापूरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:48 AM

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (Bribery Department)ने ताब्यात घेतलं आहे. गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप या सहायक पोलीस निरीक्षका (Assistant Inspector of Police)वर आहे. दिनेश श्रीकांत कुलकर्णी असे लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या संदर्भात तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचून कुलकर्णी याच्यावर कारवाई करण्यात आली. (In Solapur, an Assistant Inspector of Police was arrested by the Bribery Department)

तडजोडीअंती 50 हजार रुपये घेण्याचे ठरले होते

तक्रारदाराच्या विरोधात सोलापुरातल्या जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे करत होते. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या नातेवाईकाला देखील आरोपी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर नातेवाईकांना या गुन्ह्यात आरोपी करू नये असे वाटत असेल तर एक लाख रुपये द्यावे अशी मागणी सपोनि कुलकर्णी यांनी केली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये घेण्याचे ठरले होते. आरोपी पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी यांनी जरी पैसे स्वीकारले नसले तरी ज्यांनी लाचेची मागणी केली होती. असे तपासात निष्पन्न झाल्या कारणाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.

अहमदनगर लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले

अहमदनगरला कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलेय. सुनील नागरे आणि कमलाकर पवार अशी या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं असून शेतजमिनीच्या मोजणीनुसार खातेदारांची पोटहिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होतीय. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या पथकाने सापळा रचून वीस हजार रुपयांची रक्कम स्विकारताना असता या दोघांनाही रंगेहाथ पकडले आहेय. याबाबत कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहेय. (In Solapur, an Assistant Inspector of Police was arrested by the Bribery Department)

इतर बातम्या

Law and Order : पोलीस स्टेशनमधलं सगळ्यात मोठं पद कोणतं असतं माहीत आहे? चला जाणून घेऊया!

Palghar Accident : पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, कार चालकाचा मृत्यू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.