आषाढी यात्रेमध्ये कोट्यवधी रुपये विठ्ठलाच्या चरणी, भाविकांनी केले भरभरून दान

आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनाकरिता राज्यभरातून आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून दान दिले. यावर्षी आषाढी यात्रेत तब्बल सहा कोटी 28 लाख रुपयाचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले आहेत.

आषाढी यात्रेमध्ये कोट्यवधी रुपये विठ्ठलाच्या चरणी, भाविकांनी केले भरभरून दान
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 5:11 PM

सोलापूर : पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे वारकऱ्यांची मांदीयाळी. आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविक मंदिराला दान देतात. हे दान वेगवेगळ्या प्रकारे दिले जाते. या दानाच्या रक्कमेतून कोट्यवधी रुपये दरवर्षी जमा होतात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त दान जमा झाले. आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनाकरिता राज्यभरातून आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठलाच्या चरणी भरभरून दान दिले. यावर्षी आषाढी यात्रेत तब्बल सहा कोटी 28 लाख रुपयाचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 57 लाख 63 हजार इतके उत्पन्न अधिक मिळाले. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

लाडू विक्रीतून ७५ लाख रुपये

बुंदीचा लाडू प्रसाद विक्रीतून 75 लाख रुपये समितीला मिळाले. तीस लाख रुपयाचे सोने-चांदीच्या वस्तू श्री विठ्ठलाच्या चरणी दान देण्यात आल्या. रुक्मिणी मातेच्या चरणावर 12 लाख 68 हजार रुपये दान देण्यात आले.

असे मिळाले दान

तुळशी पूजा 42 हजार

देणगी दोन कोटी तेरा लाख

भक्तनिवास वेदांत दोन लाख 42 हजार

व्हिडिओकॉन एक लाख

भक्तनिवास 19 लाख 82 हजार

मनी ऑर्डर एक लाख 40 हजार

महानैवेद्यकीय योजना 98 हजार

ऑनलाइन नित्य पूजा 42 हजार

वारकऱ्यांच्या रूपाने एसटीला विठुराया पावला आहे. आषाढी एकादशीसाठी केलेल्या नियोजनातून सांगली विभागाला ६४ लाखावर उत्पन्न मिळाले आहे. ७९ हजार ८३८ वारकऱ्यांची सुखरूप आणि सुरक्षित वारी घडवून आणण्यात सांगली विभागाला यश आले. २५ जून ते ४ जुलैपर्यंत केलेल्या नियोजनातून जिल्ह्यातील सांगली, शिराळा, इस्लामपूर, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, विटा, पलूस, तासगाव आगारांतून गाड्या धावल्या. वारकऱ्यांच्या माउलीप्रती असलेल्या ओढीतून सांगली विभागाच्या तिजोरीत ६४ लाखावर रुपये जमा झाले. त्यामुळे विठ्ठल पावला असे म्हणावे लागणार आहे. हे उत्पन्न जरी मोठे दिसत असेल तरी ते ना नफा, ना तोटा असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.