200 टाक्यांचं ऑपरेशन होऊनही ‘ती’ लावणीच्या ठेक्यावर थिरकली, कोण आहे ही लावण्यवती?

प्रितीचं तीन महिन्यांपूर्वीच मोठं ऑपरेशन झालं. तिच्या शरीरावर ऑपरेशनच्या वेळी तब्बल 200 टाके पडले. पण तरीही तिन हार मानली नाही. ती सर्व त्रास सोसून अकलूजच्या लावणी स्पर्धेत सहभागी झाली.

200 टाक्यांचं ऑपरेशन होऊनही 'ती' लावणीच्या ठेक्यावर थिरकली, कोण आहे ही लावण्यवती?
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 11:21 PM

रवी लव्हेकर, Tv9 प्रतिनिधी, सोलापूर | 11 फेब्रुवारी 2024 : राज्यात मानाची मानली जाणारी अकलूजची लावणी स्पर्धा लावणी कराकरांसाठी एक मोठा सोहळा असतो. या स्पर्धेसाठी लावणी कलाकार दोन-दोन महिन्यांआधी तयारी करतात. अकलूजच्या लावणी स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे नखापासून ते केसापर्यंतच्या अदाकारीची नोंद यात बारकाईने घेतली जाते. या स्पर्धेचं निमंत्रण मिळाल्यानंतर कलाकारांची एकप्रकारे दिवाळीच असते. विशेष म्हणजे या स्पर्धेत एक कलाकार तर आजारी असून सहभागी झाली आहे. या लावणी कलाकाराचं प्रिती खामगावकर असं नाव आहे. प्रितीचं तीन महिन्यांपूर्वीच मोठं ऑपरेशन झालं. तिच्या शरीरावर ऑपरेशनच्या वेळी तब्बल 200 टाके पडले. पण तरीही तिन हार मानली नाही. ती सर्व त्रास सोसून अकलूजच्या लावणी स्पर्धेत सहभागी झाली.

“मला डान्स खूप आवडतो. माझी अशी इच्छा होती की, चांगली तब्येत असताना मंचावर यावं. पण ते शक्य झालं नाही. माझ्या नशिबातचं होतं की, ऑपरेशन व्हावं आणि नंतर मी इथे यावं. माझं पॅनक्रिआजचं खूप मोठं ऑपरेशन झालं आहे. हे ऑपरेशन होऊन फक्त तीनच महिने झाले आहेत. या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. माझी खूप इच्छा होती की, मी ही स्पर्धा करावी, म्हणून मी चंदन सरांना बोलली. तर त्यांनी माझ्यावरती विषय लिहिला. मी ती लावणी सादर केली”, असं प्रितीने सांगितलं.

‘मला स्वत:ला भानच उरलं नव्हतं’

“ही लावणी करताना मला स्वत:ला भानच उरलं नव्हतं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी जेवढी मेहनत केली तेवढं यशही मिळालं. अनेक लोकांना माझं कौतुक केलं. गळ्याला लावलं. मी खूप आनंदी झाले. माझं श्रेय मला मिळालं. मी खूप खूश आहे. आम्ही सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली. इतर कलाकारांमुळेच आम्ही इथे आलो. आम्ही स्वत:ची पार्टी घेऊन पहिल्यांदा आलो”, असं प्रिती खामकर म्हणाली.

माया खामगावकर यांच्यादेखील गुडघ्याला दुखापत

लावणी कलाकार माया खामगावकर यांच्यादेखील गुडघ्याला दुखापत झालीय. तरीदेखील त्यांनी नृत्य केलं. “गुडघे दुखत असले तरी मला पैलवानाची लावणी करावी लागली. त्यामुळे मला खूप त्रास झाला. पण हे होणारच. चांगलं सादरीकरण करायचं तर ते होणारच आहे. पण जे काही सादरीकरण झालं त्यामुळे मी खूप खूश आहे. हे बाळदादा, स्वरुपाराणी दिदी यांच्यामुळे शक्य झालंय. त्यांनी ही स्पर्धा कायम ठेवावी”, अशी विनंती मायाने केली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.