कोण म्हणतं जरांगे फॅक्टर चालला नाही?; हा आमदार म्हणाला, माझ्यासाठी तर…

Manoj Jarange Factor : राज्यात महायुतीची त्सुनामी आली. त्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. तर जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याचा दावा करण्यात आला. मनोज जरांगे यांनी हा दावा खोडला. तर आता या आमदाराने पण जरांगे फॅक्टरविषयी एक मोठं विधान केलं आहे. त्याची संपूर्ण राज्यात जोरात चर्चा आहे.

कोण म्हणतं जरांगे फॅक्टर चालला नाही?; हा आमदार म्हणाला, माझ्यासाठी तर...
मनोज जरांगे फॅक्टर
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 11:54 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. महाविकास आघाडीला 50 जागा मिळवताना मोठी दमछाक झाली. तर महायुतीचा झंझावात दिसून आला. महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं. तर भाजपाने मॅजिक फिगरपेक्षाही उत्तुंग कामगिरी केली. या सर्व घाडमोडीत जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरल्याची आवई उठली. लोकसभेत जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला होता. तर आता विधानसभेला मात्र तो प्रभाव दिसून आला नाही, असा दावा करण्यात आला. हा दावा मनोज जरांगे पाटील यांनी खोडून काढला. तर काहींनी मराठा उमेदवारांची यादीच वाचून धाकवली. त्यात यावेळी मराठा आमदारांची संख्या वाढल्याचा दावा करण्यात आला. आता या सर्व चर्चेत आमदार अभिजीत पाटील यांनी पण उडी घेतली आहे. त्यांनी जरांगे फॅक्टरविषयी मोठे विधान केले आहे. त्याची राज्यभर चर्चा होत आहे.

जरांगे फॅक्टरचा मला फायदा

जरांगे फॅक्टरविषयी मतमतांतरे आहेत. काही जणांचा हा फॅक्टर चालल्याचा दावा आहे. तर काही जणांनी हा दावा खोडून काढला आहे. तर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्याला मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा फायदा झाल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणला होता. त्यांच्याविरोधात मोठी राजकीय फळी उभी असताना आणि मतदान विभागणीसाठी उमेदवार उभे असतानाही त्यांनी विजय मिळवला. त्यांनी या विजयाचे श्रेय मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.

हे सुद्धा वाचा

ऊसाला ३५०० रुपये दर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ऊसाला ३५०० रुपये दर देण्याचे जाहीर करून शब्द दिला होता. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी दिलेला शब्द नेहमीच पाळतो.३५०० रुपये दर देणे अवघड नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. पण विरोधक चुकीच्या बातम्या पेरुन वल्गना करीत अफवा पसरवत आहेत. याचा विरोधकांना काडीमात्र ही फायदा होणार नाही.विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढताना २५०० रुपये दर देणार सांगीतले होते. तो दिला. आता तर ३५०० रुपये दर डोळे झाकून देणार आहे, असा दावा पाटील यांनी केला. आपल्या दाव्यात कुठलीही शंका बाळगायचं कारण नाही. कारखान्यावर वाहने लावायला देखील जागा नाही. विठ्ठल कारखाना मजबुतीने चालू आहे, असे ते म्हणाले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.