सोलापुरात बारबालांवर पैशांची उधळण, ऑर्केस्ट्रा बारमधील 49 जणांवर कारवाई, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : जिल्ह्यातील गुलमोहर ऑर्केस्ट्रा बारमध्ये (Bar) चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैशांचा पाऊस पाडला जात होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) गुलमोहर ऑर्केस्ट्रा बारमध्ये छापा (police raid) टाकला. पहाटे साडेतीन वाजता टाकलेल्या या छाप्यामध्ये 49 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये 2 लाख 71 हजार 380 रुपयांच्या रोख रकमेसह 59 लाख 78 हजार 880 रुपये […]
सोलापूर : जिल्ह्यातील गुलमोहर ऑर्केस्ट्रा बारमध्ये (Bar) चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैशांचा पाऊस पाडला जात होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) गुलमोहर ऑर्केस्ट्रा बारमध्ये छापा (police raid) टाकला. पहाटे साडेतीन वाजता टाकलेल्या या छाप्यामध्ये 49 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये 2 लाख 71 हजार 380 रुपयांच्या रोख रकमेसह 59 लाख 78 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या विशेष पोलीस पथकाने (special police squads) हा छापा टाकला असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, गुलमोहर ऑर्केस्ट्रा बार हा माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यापूर्वी देखील या बारवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. या ऑर्केस्ट्रा बारमध्ये सोलापूर शहर, जिल्ह्यासह कर्नाटकातील ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात, अशी माहिती आहे.
49 जणांवर कारवाई
सोलापूर जिल्ह्यातील गुलमोह ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांना पैशांची उधळण सुरु असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या बारव छापा टाकला. यावेळी बारबालांवर पैशांची उधळण होत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. बारमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 2 लाख 71 हजार 380 रुपयांच्या रोख रकमेसह 59 लाख 78 हजार 880 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. तर 49 जण यावेळी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
बारचं पोलीस कनेक्शन?
गुलमोहर ऑर्केस्ट्रा बार हा माजी पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे संशयाची सुई आणखी खोल जातेय. यापूर्वी देखील या बारवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर घडलेला हा दुसरा प्रकार आहे. या ऑर्केस्ट्रा बारमध्ये सोलापूर शहर, जिल्ह्यासह कर्नाटकातील ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या बारला अभय तर दिला जात नाही ना, अशीही चर्चा आहे. आता पोलीस या बारवर काय कारवाई करतात, या बारसंबंधित मोठ्या हातांवर पोलीस कारवाई करणार, की त्यांना अभय देणार, ये येत्या काळातच कळेल.
बारचे परराज्यातही ग्राहक
सोलापुरातील या गुलमोह ऑर्केस्ट्रा बारमध्ये परराज्यातून ग्राहक येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे या बारमधील कनेक्शनकडे पुन्हा एकदा संशयाच्या दृष्टीनं पाहिलंय जातंय. माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा बार असल्याने तर या बारकडे दुर्लक्ष केलं जातं नाहीये ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. आता सोलापूर पोलीस काय कारवाई करतात, असे प्रकार टाळण्यासाठी काय पाऊल उचलतात, ते पाहणं महत्वाचं ठरेल.
इतर बातम्या