सत्तेचा सारीपाट, शरद पवारांचा अजित पवारांना जोराचा धक्का? 6 वेळा निवडून आलेल्या आमदाराची मोठी घोषणा

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी शरद पवार गटाची ताकद आता वाढताना दिसत आहे. शरद पवार गटात आता अजित पवार गटाचा आणखी एक बडा नेता प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. हा आमदार तब्बल 6 वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेला आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

सत्तेचा सारीपाट, शरद पवारांचा अजित पवारांना जोराचा धक्का? 6 वेळा निवडून आलेल्या आमदाराची मोठी घोषणा
शरद पवार आणि अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 3:54 PM

लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातील घडामोडी चांगल्याच चर्चेत ठरल्या. या मतदारसंघात महायुतीत मोठा वाद बघायला मिळाला होता. भाजपचे तत्कालीन माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं होतं. पण तेव्हा भाजपमध्ये असलेले धैर्यशील मोहिते पाटील हेदेखील इच्छुक होते. त्यांनी आपली उमेदवारीची इच्छा आधीच व्यक्त केली होती. पण तरीही पक्षाने त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे नाराज झालेले मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी मिळवली. दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अजित पवार गटातील माढ्याचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचाही विरोध होता. त्यामुळे गोष्टी रणजितसिंह यांच्या विरोधात गेल्या आणि निकालही त्यांच्याच विरोधात आला. धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्हावर जिंकून आले. विधानसभेत आता तुतारीच माढ्यात मोठा राजकीय गेम करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या माढा विधानसभेत सुरु असलेल्या घडामोडी या शरद पवार गटासाठी पोषक असल्याचं चित्र आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे विद्यामान आमदार आहेत. विशेष म्हणजे ते गेल्या सहा टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांची माढ्यात तितकी मोठी राजकीय ताकद आहे. बबनराव शिंदे यांना आता निवडणूक लढण्याची इच्छा नाही. त्यांना त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना या निवडणुकीत उतरवायचं आहे. पण महायुतीत शिवसेनादेखील या मतदारसंघावर दावा करत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी आखत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे बबनराव शिंदे हे शरद पवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी त्याबाबतची मोठी घोषणा आज करुन देखील टाकली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हा मोठा राजकीय झटका आहे.

बबनराव शिंदे यांनी काय केली घोषणा?

अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेची मोठी राजकीय घोषणा केली. मुलाला तुतारी किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं करणार, अशी घोषणा बबनराव शिंदे यांनी केली आहे. महायुतीचा विषय संपलाय असं म्हणत आमदार बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार, अशी घोषणा केली. “मी शरद पवारांच्या साथीने 38 वर्षे राजकारण करीत आलोय. त्यामुळे मी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे. ते तिकीट देतील की नाही हे मला माहिती नाही. पण यंदाच्या निवडणुकीत माझा मुलगा रणजितसिंहला शरद पवारांनी तिकीट दिले तर ठिक, नाहीतर अपक्ष निवडणुकीला सामोरे जाईल”, अशी भूमिका बबनराव शिंदे यांनी मांडली.

आमदार बबनराव शिंदे यांना पुतण्या धनराज शिंदेंच्या बंडखोरीच्या प्रश्नावर “आमचा घरचा प्रश्न संपलेला आहे”, असं उत्तर त्यांनी दिलं. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या प्रश्नावर “आम्हाला कोणाचेही आव्हान नाही”, असं उत्तर बबनराव शिंदे यांनी दिलं. “ऊस दरावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. मला त्या मंडळींवर काही बोलायचं नाही. एफआरपी पेक्षा जास्त दर देणं ज्याच्या त्यांच्या परिस्थितीवर अंवलंबून असतं. पण ज्याची परिस्थिती नाही ते सुद्धा दर जाहीर करीत आहेत. त्याचे अभिनंदन”, असं म्हणत आमदार शिंदेंनी अभिजीत पाटलांना टोमणा लगावला. अभिजीत पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.
'मला संपवू नका, मी जिवंत...', अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
'मला संपवू नका, मी जिवंत...', अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?.
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्...
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्....
भिडेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, 'हिंदू महामूर्ख अन् दांडिया हिंदूना...'
भिडेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, 'हिंदू महामूर्ख अन् दांडिया हिंदूना...'.
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार.