‘मी आयुष्यात असा पंतप्रधान बघितला नाही’, शरद पवार मोदींबद्दल नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापूरमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दत एक विधान केलं. सोलापुरात आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवरही यावेळी निशाणा साधला.

'मी आयुष्यात असा पंतप्रधान बघितला नाही', शरद पवार मोदींबद्दल नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 4:29 PM

सागर सुरवसे, Tv9 मराठी, सोलापूर | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते सोलापुरात बोलत होते. सोलापुरात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. केंद्राचं शेतकऱ्यांबद्दल असलेल्या धोरणावर त्यांनी भाष्य केलं. तसेच आपण कृषीमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी घेऊन गेलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

“सध्या मी कुठेच नाही. पण त्याची काळजी करू नका. मी कुठेच नसलो तरी सगळीकडे असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूरला आल्यावर मला म्हणाले की, शरद पवारांना काय समजते. पण लोकानी त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे लोकांना हे समजते की काय करायचे?”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“मी कृषीमंत्री असताना यवतमाळमध्ये आत्महत्या झाल्या. त्यानंतर मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यवतमाळला नेले आणि आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर लक्षात आलं की, शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही देशातील उद्योजकांचे थकीत कर्ज वसुली सुरु केली आणि देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

“मी जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांची भाषणे ऐकली. मात्र नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे स्थानिक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात हे चुकीचं आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी टीका केली नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही काका-पुतणे एकत्र आले होते. याबाबत शरद पवारांनी भूमिका मांडली. “एकत्र दिवाळी करणे ही आमची अनेक वर्षाची परंपरा आहे. या भेटीत कोणताही राजकीय लवलेश नव्हता, मात्र मीडियाला बातमी लागते”, असं शरद पवार म्हणाले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.